जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषदेची उद्या सकाळी ११ वाजता सर्वसाधारण सभा असताना आज दुपारी २ वाजेच्या सुमारास कोपरगाव नगरपरिषदेचे सभा विषयाचे लिपिक दत्तात्रय किसान पंडोरे (वय-५५) यांचा सडे ग्रामपंचायत हद्दीतील गोदावरी नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यांजीक असलेल्या खडकाजवळ मृतदेह आढळून आल्याने कोपरगाव नगरपरिषद कर्मचाऱ्यांसह शहरात खळबळ उडाली आहे.हि हत्या की आत्महत्या याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
याबाबत आमच्या प्रतिनिधीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी हे प्रेत त्यांचेच आहे की नाही खातरजमा करण्याचे काम सुरू असल्याचे म्हटले आहे.तर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पो.हे.कॉ.श्री म्हस्के यांनी मात्र याबाबत दुजोरा दिला असून त्यांच्या घरातील अन्य नातेवाईकांना ओळख पटली असल्याचे म्हटलें आहे.मात्र अद्याप शव विच्छेदन होण्यास उशीर असल्याने त्यानंतरच या मृत्यूचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,साधारण वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी मयत दत्तात्रय पंडोरे हे आपल्या वडिलांच्या जागी नगरपरिषदेत सेवेत दाखल झाले होते.ते जवळपास पंधरा वर्ष वसुली विभागात काम पाहत होते.व दि.१ जून पासून ते नगरपरिषद सभा विभागाचे लिपिक सेवानिवृत झाल्याने त्यांच्याकडे नगरपरिषद प्रशासनाने या विषयाचे कामकाज सोपवले होते.ते तो विषय नियमित पाहत असताना आजची हि दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.ते नेहमी आपल्या शुक्लेश्वर मंदिरानजीकच्या कोकमठाण हद्दीतील घरुन आज सकाळी प्रभात फेरीसाठी बाहेर पडले होते.मात्र आठ वाजून गेल्यावरही ते परत न आल्याने घरच्या त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरु केला होता.मात्र ते मिळून आले नव्हते.मात्र दुपारी २ वाजेच्या सुमारास सडे ता.कोपरगाव येथील पोलीस पाटील यांचा दुरध्वनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात खणाणला असता त्यांनी एका अनोळखी इसमाचा मृतदेह या सडे शिवारात नदी पात्रात आढळला असल्याचे वृत्त दिले होते.त्या नंतर रुग्णवाहिका तालुका पोलिसानी त्या घटनास्थळी रवाना केली असता व रुग्ण वाहिकेने सदरचे प्रेत ग्रामीण रुग्णालयात आणले असता सकाळपासून आपल्या वडिलांच्या शोधात असलेल्या मुलांना हि बातमी मिळाली असता त्यांनी ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली व सदरचे प्रेत पहिले असता ते आपल्या वडीलांचेच असल्याचे सांगितल्याने ओळख पटली आहे.त्यामुळे सदरचे प्रेत हे नगरपरिषद कर्मचारी दत्तात्रय पंडोरे यांचेच असल्याचे सिद्ध झाले आहे.त्यामुळे हि हत्या की आत्महत्या असा सवाल निर्माण झाला आहे.या आधीच फेब्रुवारी मध्ये एका वसुली विभागातील जेष्ठ कर्मचाऱ्याने औषध घेऊन आपली जीवनयात्रा संपवली असताना हि सात महिन्यातील दुसरी आत्महत्या ठरण्याची शक्यता आहे.या बाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
दरम्यान उशिराने आलेल्या माहितीनुसार कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी मयताचा मुलगा सागर दत्तात्रय पंडोरे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून त्यात आपले वडील सकाळी प्रभात फेरीसाठी गेले होते ते परतलेच नाही त्यांचा पाय घसरून ते पाण्यात बुडून मृत्यू पावले असल्याचे म्हटले आहे.व कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात या बाबतची माहिती प्राप्त झाली असता तेथे आपण त्याना ओळखले असल्याचे म्हटले आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी अकस्मात मृत्यू दप्तर नोंद क्रं.४६/२०२० सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.एम.म्हस्के हे करीत आहेत.
Leave a Reply