जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील वृत्तपत्र विक्रेते राजेन्द्र हाबडे यांच्या मातोश्री मीनाताई पुंडलिक हाबडे (वय-६१ ) यांचे नुकतेच नगर येथील सीव्हील हॉस्पिटल येथे कोरोनाने निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात राजेंद्र हाबडे व एक मुलगी असा परिवार आहे.
कोपरगाव शहरात कोरोनाची साथ दिवसागणिक वाढत चालली असून अनेकांना आपल्या जीवलगांना गमवावे लागत आहे.आज पर्यंत कोरोनाने २३ नागरिकांचे बळी घेतले आहे.स्व.मीनाताई हाबडे यांना २ सप्टेंबरला श्वसनाचा त्रास होऊ लागला त्यामुळे त्याना आधी कोपरगाव येथील कोविड सेंटर मध्ये भरती करण्यात आले होते.मात्र तेथेही त्याना अस्वस्थ वाटू लागल्याने त्याना नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी भरती करण्यात आले होते.
कोपरगाव शहरात कोरोनाची साथ दिवसागणिक वाढत चालली असून अनेकांना आपल्या जीवलगांना गमवावे लागत आहे.आज पर्यंत कोरोनाने २३ नागरिकांचे बळी घेतले आहे.स्व.मीनाताई हाबडे यांना २ सप्टेंबरला श्वसनाचा त्रास होऊ लागला त्यामुळे त्याना आधी कोपरगाव येथील कोविड सेंटर मध्ये भरती करण्यात आले होते.मात्र तेथेही त्याना अस्वस्थ वाटू लागल्याने त्याना नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी भरती करण्यात आले होते.मात्र वैद्यकीय अधिकऱ्यानी शर्तीचे प्रयत्न करूनही त्याना वाचविता आले नाही.त्यांची नुकतीच प्राणज्योत मालवली आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.आपल्या पतीच्या निधनानंतर त्यांनी प्रपंचाचा संपूर्ण भार वाहून आपल्या चिल्या-पिल्याना वाढवले होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या निधना बदद्दल कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे,राज्य मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष नानासाहेब जवरे,पत्रकार नानासाहेब शेळके,शिवाजी गायकवाड,वृत्तपत्र विक्रेते रामभाऊ ठोंबरे,वृत्तपत्र विक्रेते संघाचे अध्यक्ष बाळासाहेब आहेर,दत्तात्रय बिडवे आदींनी शोक व्यक्त केला आहे.
Leave a Reply