जनशक्ती न्यूजसेवा
संवत्सर-(शिवाजी गायकवाड)
संवत्सरसह कोरोना साथीचा खर्च सामान्य माणसाला परवडणारा नाही.नागरिकांना कोरोनाची लागण झाली तर दवाखान्यात खाटा उपलब्ध होणे अवघड बनले आहे.आजच हि स्थिती आहे भविष्यात अजून प्रतिकूल स्थिती होऊ शकते.त्यामुळे नागरिकांनी आपले जीवित वाचविणे याला प्रथम प्राधान्य देणे गरजेचे बनले आहे-राजेश परजणे
कोपरगाव शहर व तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या साथीने उचल खाल्ली असून आज आलेल्या अहवालात केलेल्या अँटीजन रॅपिड टेस्ट बाधित रुग्णांची संख्या १४ झाली आहे त्यात कोपरगाव शहरातील ०८ बाधित निघाले तर ग्रामीण भागातील ०६ जण बाधित असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान आता कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या १ हजार २०० इतकी झाली आहे.त्यात एकट्या संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत ६० बाधित रुग्ण आढळले असून त्यातील ६ जण गंभीर स्थितीत असल्याची विश्वसनिय माहिती आमच्या प्रतिनिधीस प्राप्त झाली आहे.त्यामुळे हि साथ सामान्य ग्रामस्थांना परवडणारी नाही व वैद्यकीय खर्च हि परवडणारा नसल्याने या बाबत नुकतीच ग्रामसभा घेण्यात आली.त्यात हा निर्णय एकमुखाने घेण्यात आला आहे.त्या वेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
या काळात संपूर्ण टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे.यावेळी गोदावरी परजणे सहकारी दुध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे म्हणाले की,”वर्तमान स्थितीत कोरोना रुग्णांचा खर्च सामान्य माणसाला परवडणारा नाही.नागरिकांना कोरोनाची लागण झाली तर दवाखान्यात खाटा उपलब्ध होणे अवघड बनले आहे.आजच हि स्थिती आहे भविष्यात अजून प्रतिकूल स्थिती होऊ शकते.त्यामुळे नागरिकांनी आपले जीवित वाचविणे याला प्रथम प्राधान्य देणे गरजेचे बनले आहे.सर्दी,पडसे,ताप,घसा खवखवणे आदी लक्षणे दिसल्यास तातडीने सरकारी दवाखान्यात गेले पाहिजे अन्यथा प्राणाशी गाठ आहे.मधुमेह,उच्च रक्तदाब,व श्वसनाचे दीर्घ आजार आदींनी जनसामान्या पासून अंतर टाकून राहण्याची गरज आहे.उशीर झाल्यास वाचणे अवघड आहे.लग्न,दहावे,तेरावे,व तत्सम कार्यक्रम टाळावे व सुरक्षित अंतर राखून मुखपट्या लावाव्या व तत्सम उपाय योजना करण्यास सहकार्य करून नागरिकांनी या टाळेबंदीला साथ देणे आवश्यक बनले आहे”.
या वेळी लक्ष्मण साबळे म्हणाले की,”आज पैसा कितीही असला तरी काही उपयोगाचा नाही,रुग्णालायत खाटांच उपलब्ध होत नाही.अनेक पत्रकार राजकारणी आदींना पैसे असूनही रूग्णालयात जागा भेटत नाही यातच सर्व काही आले.त्यामुळे ग्रामस्थांनी या पासून योग्य तो बोध घ्यावा” असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.
सदर प्रसंगी संवत्सर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.श्री खोत यांनी,”कोरोना साथीचे लक्षणे सांगून त्यापासून बचाव करण्याचे उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे. व आज दोन अंकी रुग्ण आहे ते तीन अंकी व्हायला वेळ लागणार नाही”असा इशारा शेवटी दिला आहे.
Leave a Reply