जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नगर-मनमाड या राज्यमार्गाची दुरावस्था होऊन त्यात मोठ्या प्रमाणावर अपघात होत असून रस्त्याच्या नादुरुस्तीमुळे वीस पैकी सहा कोरोना रुग्णांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती नुकतीच कोरोना साथीचा आढावा घेताना प्राप्त झाली होती त्याची गंभीर दखल कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी घेऊन नुकतीच या रस्त्याची पाहणी केली आहे.त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती होण्याची शक्यता वाढली असून या बाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील वीस पैकी सहा रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा बळी गेल्याची खळबळ जनक कबुली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसौन्दर यांनी दिल्याने तालुक्यासह शहरात मोठा कोलाहल निर्माण झाला होता.व त्या ननंतर सत्ताधारी पक्षाचे आ.आशुतोष काळे नेमकी काय भूमिका घेणार या आकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते.
कोपरगाव तालुका तहसील कार्यालयात नुकतीच कोरोना साथ आढावा बैठक आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाली होती त्यावेळी तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढत असलेली लक्षणीय संख्या व गेलेले वीस बळी यावर खल झाला असून या वेळी नगर – मनमाड राज्यमार्गाची वर्तमान स्थितीत वाट लागली असून या मार्गावरून नगर येथे पोहचण्यासाठी तब्बल तीन तासाहून अधिकचा वेळ लागत असल्याने तालुक्यातील वीस पैकी सहा रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा बळी गेल्याची खळबळ जनक कबुली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसौन्दर यांनी दिल्याने तालुक्यासह शहरात मोठा कोलाहल निर्माण झाला होता.व त्या ननंतर सत्ताधारी पक्षाचे आ.आशुतोष काळे नेमकी काय भूमिका घेणार या आकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते.त्यातच आ.काळे यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन तातडीने या मार्गाची पाहणी केल्याने हे काम लवकरच सुरू होणार असल्याचे चित्र आहे या मार्गावरील कन्सल्टंट कम्पनी सब्डक्शन झोन कन्सल्टंसीच्या अधिकाऱ्यांसोबत हि पाहणी केली आहे.
कोपरगाव तालुक्यात नगर-मनमाड हायवेवर पुणतांबा चौफुली, संत जनार्दन स्वामी आश्रम, बेट नाका, श्री साईबाबा चौफुली, येवला नाका आदी ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर हायवेचे पुढील काम करताना उपाययोजना करण्यात याव्या अशा सूचना यावेळी आ.काळे यांनी सब्डक्शन झोन कन्सल्टंसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,सब्डक्शन झोन कन्सल्टंसीचे अनुप सूर्यवंशी,तानाजी चिटे, सार्वजनिक बांधकामचे अभियंता प्रशांत वाकचौरे,कोपरगाव नगरपरिषदेचे उपअभियंता डी. एस.वाघ,राजेंद्र जोशी,राहुल चांदगुडे,संदीप शिरोडे,सचिन गवारे, सोमनाथ आढाव, निलेश पाखरे आदी उपस्थित होते.
Leave a Reply