जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील नैऋत्येकडे अवर्षणग्रस्त तेरा गावात या वर्षी तब्बल बावीस वर्षांनी पुरेसा पासून बरसला असून नदी-नाले पाझर तलाव तुडुंब भरले आहेत.अनेक पाझर तलावात पाणी साठल्याने शेतकऱ्यांनी केलेल्या गाळपेरित उभारलेल्या शेतात पाणी गेल्याने अनेकांची उभी पिके पाण्याखाली गेल्याचा तक्रारी महसूल विभागाकडे आल्याने आज सकाळीच तहसीलदार चंद्रे यांनी या भागाचा पाहणी दौरा केला असून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
या शहापूर पाझर तलावाच्या सांडव्याचे पाणी पुन्हा मूळ दहा मोऱ्यांच्या नदीत येण्या ऐवजी ते तीन मोऱ्यांच्या ओढ्याला काढून दिले जात असल्याने या पाथरे हद्दीतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.व उभी खरीप पिके पाण्याखाली गेली आहे.हि बाब तहसीलदार चंद्रे यांचे निदर्शनास आणून देऊन व बेकायदा सांडव्याचे पाणी अन्यत्र काढून देणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करावी-सुनील शिंदे,संचालक,कर्मवीर सहकारी कारखाना.
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव,जवळके,शहापूर,अंजनापूर,आदी गावांतील काल पुन्हा दुपारी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.त्यातून खरीप पिकांची काढणी धोक्यात आली आहे.आता खरीप पिके भरली असून ती काढणीला आली आहेत.शहापुर येथील पाझर तलावातील पाणी काही शेतकऱ्यांनी बेकायदा काढून दिल्याने त्याच्या तक्रारी तहसीलदार यांचेकडे तेथील शहापूर सरपंच व कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक सुनील शिंदे यांनी दूरध्वनीवरून केल्या होत्या.व प्रत्यक्ष पहाणीची मागणी केली होती.त्याची गंभीर दाखल तहसीलदार योगेश चंद्रे यांनी घेतली व आज सकाळी या भागाचा दौरा केला आहे.बऱ्याच शेतकऱ्यांनी पाझर तलावात सरकारने भूसंपादन केलेल्या जमिनीत खरीप पिकांच्या पेरण्या केल्या आहेत.मात्र यंदा बक्कळ पाऊस झाल्याने या गाळपेरी पाझर तलावातील पाण्याखाली आल्या आहेत.या शेतकऱ्यांनी आपली जमीन या पाझर तलावात देताना त्यांना महसूल विभाग व लघु पाटबंधारे यांनी भरपाई दिलेली आहे.या शेतकऱ्यांनी त्यांच्या बेकायदा तलावातील पाणी काढून दिल्याने शहापूर येथील ग्रामपंचायतीनेही तक्रारी केल्या आहेत. या शेताची पाहणी करण्यासाठी व समस्येवर उपाययोजना करण्यासाठी तहसीलदार यांनी आज समक्ष जाऊन पाहणी केली असता या पाझर तलावाच्या सांडव्याचे पाणी पुन्हा मूळ दहा मोऱ्यांच्या नदीत येण्या ऐवजी ते तीन मोऱ्यांच्या ओढ्याला काढून दिले जात असल्याने या पाथरे ता.सिन्नर हद्दीतील जमिनी मात्र मूळ रहिवाशी कोपरगाव तालुक्यातील असणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची बाब कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक सुनील शिंदे यांनी तहसिलदार यांचे निदर्शनास आणून दिली व बेकायदा सांडव्याचे पाणी अन्यत्र काढून देणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.त्या बाबत तहसीलदार चंद्रे यांनी १९७६ साली मंजूर बंधाऱ्याचे कागदपत्रे मागवली असून या बेकायदा पाणी दुसऱ्या शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात काढून दिलेल्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील शिंदे,बाळासाहेब घुमरे,पंचायत समिती अभियंता उत्तम पवार,अश्विन वाघ, मंडलाधिकारी जेडगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply