जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर शिवसेनेच्या अध्यक्षपदाबाबत सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी तातडीने बदल केला असून या जागी शहर सेनेचे उपाध्यक्ष कलविंदर हरजित सिंग दडीयाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसे सेनेचे मुखपत्र सामानात सेनेचे सचिव व खा.अनिल देसाई यांनी तसे वृत्त प्रसिद्ध केले आहे.कोपरगावात चोरून गायी खाटकांना विकण्याचा प्रकरणात युवा सेनेचा एक पदाधिकाऱ्याचा भाऊ गुंतला असल्याची घटना उघड झाल्याने खळबळ उडाली होती व त्याची पाठराखण सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्याने केली होती याची गंभीर दखल सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी घेऊन हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कोपरगावात अनेक दिवसापासून परप्रांतीय काठियावाड गायी चोरी जाण्याच्या घटना घडत होत्या व त्या वैजापूर,येवला आदी ठिकाणी खाटीक यांना विक्री करण्यात येत होती त्याला पोलिसी सूत्रांनी दुजोरा दिला होता.तर त्याबाबत लेखी अर्ज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.मात्र त्या नंतर एका पदाधिकाऱ्याने दबाव आणून या गायी वाल्यांना माघार घ्यायला लावली होती. या बाबत आमच्या प्रतिनिधीने प्रथम हि बाब बातमी प्रकाशित करून उजेडात आणली होती.
कोपरगावात अनेक दिवसापासून परप्रांतीय काठियावाड गायी चोरी जाण्याच्या घटना घडत होत्या व त्या वैजापूर,येवला आदी ठिकाणी खाटीक यांना विक्री करण्यात येत होती त्याला पोलिसी सूत्रांनी दुजोरा दिला होता.तर त्याबाबत लेखी अर्ज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.मात्र त्या नंतर एका जबाबदार पदाधिकाऱ्याने दबाव आणून या गायी वाल्यांना माघार घ्यायला लावली होती.या बाबत आमच्या प्रतिनिधीने प्रथम हि बाब बातमी प्रकाशित करून उजेडात आणली होती. या बातमीने सेनेच्या पदाधिकाऱ्यांत खळबळ उडाली होती व तो पासून या पदाधिकाऱ्यांना हटविण्याची मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवली गेल्याची माहिती आहे.त्या मोहिमेला अखेर यश आले असून आज नूतन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर झाल्याने ती मूर्त स्वरूपात आल्याची मानले जात आहे.नूतन अध्यक्ष यांनी शहर सेनेच्या संघटन वाढीत मोलाची भूमिका निभावली आहे.ते माजी नगराध्यक्ष व जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांचे समर्थक मानले जातात.
सेनेचे नूतन शहराध्यक्ष कलविंदर दडीयाल यांचे खा.सदाशिव लोखंडे,आ.आशुतोष काळे,माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे,जिल्हाध्यक्ष राजेंद्र झावरे,माजी नगरसेवक दिनार कुदळे,तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे,डॉ.अनिरुद्ध काळे,नगरपरिषदेचे गटनेते विरेन बोरावके आदींनी अभिनंदन केले आहे.
Leave a Reply