जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरंगवस शहर व तालुक्यातील आता पर्यंत कोरोनाचे २० बळी गेले असून त्यातील किमान ६ रुग्ण हे नगर-मनमाड या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे रुग्णांना पोहचण्यास व उपचार सुरु करण्यास उशीर झाल्याने त्यांना वेळेत उपचार न मिळाल्याने गेले असल्याची खळबळजनक कबुली कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसौन्दर यांनी आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्याने तालुक्यासह नगर जिल्ह्याची रस्त्याबाबतची अनागोंदी बाहेर पडली असून त्यानंतर सत्त्ताधारी पक्षाचे आ.काळे नेमकी काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
बैठकीच्या अंदाजा प्रमाणे हा चर्चेच्या अग्रस्थानी राज्यभर बहुचर्चित “आत्मा मलिक हॉस्पिटल” हेच राहिले.असून पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या उपचाराला उशीर केल्याने व उपचार करण्यास नकार दिल्याने चर्चेचा सर्वाधिक भर त्यावरच राहिला व या हॉस्पिटलच्या प्रशासनावर जास्त चर्चा ऐकायला मिळाली.त्यात बिलाची जास्त आकारणी हि चर्चेच्या केंद्रस्थानी होती.त्यामुळे या हॉस्पिटलचे संचालक पराग सूर्यवंशी, व व्यवस्थापक डॉ.अमित फरताळे व त्यांच्या सहकाऱ्यांवर बचावाचा मार्ग पत्करावा लागल्याचे दुर्दैवी चित्र दिसून आले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,सध्या कोरोना विषाणूच्या चिनी साथीने जगभर खळबळ उडवून दिली आहे.त्यामुळे जगभर ८ लाख ५० हजारहून अधिक नागरिकांचे बळी गेलेले आहे.देशभरात हि संख्या ७५ हजार ११९ वर जाऊन पोहचली असून राज्यात आतापर्यंत २७ हजार ७८७ रुग्णांचे बळी गेले आहे. तर नगर जिल्ह्यात आतापर्यंत २६ हजार ३५६ जणांना लागण होऊन त्यात ३७२ जणांचे तर कोपरगाव तालुक्यात आतापर्यंत २० जणांचे बळी गेले आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी आज तहसील कार्यालयात आढावा बैठक आयोजित केली होती.त्यावेळी हि धक्कादायक माहिती डॉ.फुलसौन्दर यांनी दिली आहे.सदर प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद,कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे,कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,डॉ.वैशाली बडदे,डॉ.गायत्री कांडेकर,आत्मा मलिक रुग्णालयाचे संचालक पराग सूर्यवंशी,संचालक डॉ.अमित फरताळे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते,डॉ.पराग सूर्यवंशी,डॉ.अमोल अजमेरे,डॉ.तुषार गलांडे डॉ.शशांक तुसे, डॉ.तुषार साळुंके,विक्रम खटकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
सरकारने सर्व मेडिक्लेम कॅशलेस करावे सर्व प्रश्न मिटून जातील व विमा कंपन्या या बहुतांशी शासनाच्याच आहे त्यामुळे त्याना अशक्य काही नाही.रुग्णालयांच्या अडचणी मिटतील व नागरिकांची गैरसोय दूर होईल अशी मागणी केली आहे.या दरम्यान हॉस्पिटल नाहक बदनाम होत असल्याचे सांगितले आहे. बऱ्याच वेळा रुग्ण रेशन कार्ड व आधार कार्ड मागूनही वेळेवर देत नसल्याने त्यांना कोणत्या योजनेत बसवायचे हे समजणे अवघड होत आहे-डॉ.अमोल अजमेरे
त्यावेळी त्यांनी अंदाजा प्रमाणे हा चर्चेच्या अग्रस्थानी राज्यभर बहुचर्चित “आत्मा मलिक हॉस्पिटल” हेच राहिले.असून पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या उपचाराला उशीर केल्याने व उपचार करण्यास नकार दिल्याने चर्चेचा सर्वाधिक भर त्यावरच राहिला व या हॉस्पिटलच्या प्रशासनावर जास्त चर्चा ऐकायला मिळाली.त्यात बिलाची जास्त आकारणी हि चर्चेच्या केंद्रस्थानी होती.त्यामुळे या हॉस्पिटलचे संचालक पराग सूर्यवंशी,डॉ.अमित फरताळे व त्यांच्या सहकाऱ्यांवर बचावाचा मार्ग पत्करावा लागल्याचे दुर्दैवी चित्र दिसून आले आहे.या रुग्णालयाच्या कारभाराची लक्तरे थेट राज्याचे आरोग्य मंत्री यांच्या पर्यंत गेली व त्यांना त्यांची उत्तरे देता-देता नाकी नऊ आल्याचे दूरदर्शनच्या पडद्यावर दिसून येत होते.त्यात हे हॉस्पिटल कोपरगाव विधानसभा मतदार संघात येत असल्याने या मतदार संघाची व त्याच्या कारभाराची चर्चा राज्यभर झाल्याने या बैठकीला आज या अर्थाने महत्व प्राप्त झाले होते.मात्र या बैठकीत सर्व भार हा विमा कंपन्या व सरकारवर सोडून देण्यात आल्याचे दिसून आले आहे.सरकारने,”सर्व उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेमार्फत कोविड केंद्रात मोफत होणार आहे”या एक वाक्याचा आदेश दिला किंवा सरकारी विमा कंपन्या या बहुतांशी सरकारी मालकीच्या असल्याने त्या रुग्णांचा भार या कंपन्यांनी उचलावा असे म्हटले तर हा प्रश्न चट दिशी मिटला जाईल असा या आत्मा मालिक प्रशासनाचा आग्रह होता व तसा पाठपुरावा आ.काळे यांनी करावा असा त्यांचा बोलण्याचा रोख होता.त्यावेळी कोविड सेंटरमध्ये असलेल्या अस्वच्छतेचा प्रश्न राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी मांडला असता त्याला डॉ.फुलसौन्दर यांनी भरती केलेले रुग्ण स्वच्छता पाळत नाही.कुठेही भाकरीचे तुकडे फेकाफेक करतात सांगितलेले नियम पाळत नाही असा आरोप केला.डॉ.अमोल अजमेरे यांनी सरकारने सर्व मेडिक्लेम कॅशलेस करावे सर्व प्रश्न मिटून जातील अशी मागणी केली व विमा कंपन्या या बहुतांशी शासनाच्याच आहे त्यामुळे त्याना अशक्य काही नाही.रुग्णालयांच्या अडचणी मिटतील व नागरिकांची गैरसोय दूर होईल अशी मागणी केली आहे.या दरम्यान हॉस्पिटल नाहक बदनाम होत असल्याचे सांगितले आहे.तर डॉ.अमित फरताळे यांनी बऱ्याच वेळा रुग्ण रेशन कार्ड व आधार कार्ड मागूनही वेळेवर देत नसल्याने त्यांना कोणत्या योजनेत बसवायचे हे समजणे अवघड होत असल्याचे सांगितले आहे.जीवनदायी योजनेची तीच बोंब असून त्यास तहसील कार्यालयाचे पत्र तीन दिवसाचे आत लागते.मात्र बऱ्याच वेळा ते मिळत नाही.असा आरोप वैद्यकीय अधिकऱ्यानी केला त्या वेळी तहसीलदार यांनी आमच्याकडॆ कर्मचारी कमी असल्याची सबब सांगितली आहे. विशेष म्हणजे महात्मा फुले जनारोग्य योजनेची बऱ्याच वेळा माहिती मागावूनही आत्मा मालिकचे वैद्यकीय अधिकारी ती देत नाही असा आरोप तहसीलदार यांनी केला व आपल्यालाही त्या योजनेची अद्याप माहिती नसल्याचे आ.काळे यांचे समोर सांगून कहर उडवून दिला आहे.त्यावेळी त्यांनी सरकार मोफत पुरवत असलेल्या अँटीजन रॅपिड टेस्ट आत्मा मालिकला देण्यात याव्या अशी मागणी केली मात्र तशी परवानगी नसल्याने त्या देता येणार नसल्याचे डॉ.फुलसौन्दर यांनी सांगितल्याने तेथे त्या तपासण्या शुल्क देऊनच कराव्या लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.मात्र त्याना तशी परवानगी नसल्याचे समजते.अन्य खाजगी प्रयोग शाळांना तशी परवानगी दिलेली आहे.अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे.
नगर येथे “सिव्हिल हॉस्पिटल”ला जाण्यास रुग्ण घाबरतात व परत येऊ की नाही याची खात्री नसल्याने तेथे उपचार घेण्यास जाण्यास टाळाटाळ करतात शिर्डी येथील साई संस्थानचे रुग्णालय मोठे व सुसज्ज असताना तेथे कोपरगावचे रुग्ण भरती होणे गरजेचे असल्याचे सांगून प्रवरा ग्रामीण रुग्णालयात केवळ राहाता तालुक्याचेच रुग्ण घेतले जात आहे-संदीप वर्पे,कार्याध्यक्ष जिल्हा राष्ट्रवादी.
याखेरीज नगर येथे “सिव्हिल हॉस्पिटल”ला जाण्यास रुग्ण घाबरतात व परत येऊ की नाही याची खात्री नसल्याने तेथे उपचार घेण्यास जाण्यास टाळाटाळ करतात अशी माहिती वर्पे यांनी देऊन शिर्डी येथील साई संस्थानचे रुग्णालय मोठे व सुसज्ज असताना तेथे कोपरगावचे रुग्ण भरती होणे गरजेचे असल्याचे सांगून प्रवरा ग्रामीण रुग्णालयात केवळ राहाता तालुक्याचेच रुग्ण घेतले जात असल्याची माहिती संदीप वर्पे यांनी आ.काळे यांना दिली आहे.त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यानी दुजोरा दिला आहे. व शिर्डी येथे संस्थानच्या रुग्णालयात उपचाराची सोय करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांचेकडे करण्याचा रास्त आग्रह धरला आहे.व त्यावेळी आ.काळे यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.असंतोष विधाते यांना ग्रामीण भागातील तपासण्या नियमित सुरु असल्याची खातरजमा करून घेतली आहे.व नसतील तर त्या सुरु करा असे फर्मान सोडले आहे.व ग्रामीण रुग्णालय व आत्मा मालिक हॉस्पिटल संचालक यांनी समन्वय ठेवण्याचे आदेश दिले आहे.व नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड करू नये व पुन्हा अशी आगळीक होता कामा नये असे शेवटी बजावले आहे.
Leave a Reply