जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
देशात अद्यापही कोरोना विषाणूची साथ जोमाने सुरु आहे.त्यामुळे देशभरातील शाळा सुरु होऊ शकलेल्या नाही त्यातच अनेक शाळा आपल्या शैक्षणिक शुल्काचे शुक्लकाष्ट पालकांच्या मागे लावत असल्याने अनेक पालक त्रस्त झाले आहेत या शाळांना शासनाने चाप लावावा अशी महत्वपूर्ण मागणी भारतीय विद्यार्थी संघटनेने नुकतीच शासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.त्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
राज्यात कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य त्या उपायोजना कराव्यात त्या नंतर महाराष्ट्रातील शाळा- महाविद्यालये सुरू करण्यात यावे अन्यथा राज्याची अवस्था इस्त्राईल सारखी होऊ शकते.इस्त्राईलमधील शाळा सुरू करण्याची चूक इस्त्राइल खुप महागात पडली असल्याचे सिद्ध झाले आहे.तसी वेळ महाराष्ट्रावर येऊ नये-भारतीय विद्यार्थी संघटना
देशभरात अद्यापही कोरोनाची साथ जोमाने सुरु आहे.देशभरात आज अखेर ३० हजार ६९० बाधित रुग्णांची वाढ होऊन एकूण रुग्ण संख्या ४३ लाख ९८ हजार १२६ वर जाऊन पोहचली आहे.तर राज्यात ०९ लाख ४३ हजार ७७२ वर जाऊन पोहचली आहे.हि संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे.त्यामुळे शाळा सुरु होण्याची शक्यता कमी होत चालली असताना राज्यातील अनेक शाळा पालकांकडून आपले शैक्षणिक शुल्क वसुलीच्या मागे लागल्या आहेत.त्यामुळे हाताला काम नसणारे पालक वैतागले आहेत.राज्यात कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य त्या उपायोजना कराव्यात त्या नंतर महाराष्ट्रातील शाळा- महाविद्यालये सुरू करण्यात यावे अन्यथा राज्याची अवस्था इस्त्राईल सारखी होऊ शकते.इस्त्राईलमधील शाळा सुरू करण्याची चूक इस्त्राइल खुप महागात पडली असल्याचे सिद्ध झाले आहे.तसी वेळ महाराष्ट्रावर येऊ नये.यासाठी भारतीय विद्यार्थी संघटनेकडून याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना ई-मेल द्वारे निवेदन दिले गेले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की,कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी टाळेबंदीमध्ये सर्वप्रथम शाळा-महाविद्यालये तत्काळ बंद केली.आता त्या पुन्हा सुरु करण्याचा विचार सरकार करत आहे.या निर्णयाचा फेरविचार करावा लागेल.कारण इस्त्राईलमधील शाळा सुरू करण्याची चूक महागात पडली आहे.इस्त्राईलमधील १२० शाळा सुरू करण्यात आल्या होत्या.अवघ्या तीन आठवड्यात या शाळांमधील ३४७ विद्यार्थी व शिक्षक कोरोना बाधित आले आहे.म्हणून संभाव्य धोका ओळखून सरकारने तत्काळ पुन्हा सर्व शाळा बंद केल्या आहेत.आज सुमारे १६ हजार विद्यार्थ्यांना १४ दिवसांसाठी घरीच बंदिस्त करण्याची वेळ ईस्त्राईलवर आली आहे. पालक चिंताग्रस्त असून, प्रशासनाच्या निर्णयावर संतापले आहेत.शाळा-महाविद्यालये सुरू केल्यास काय परिणाम होतील. याचा दाखला ईस्त्राईलच्या रुपाने बोलका आहे.शाळा सुरू करुन पुन्हा बंद करण्याची वेळ येवू नये.दुसरीकडे,कोरोना आणि टाळेबंदीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे रोजगार आणि नोकऱ्या गेल्या आहेत.तीन ते चार महिन्यांचा पगार अनेकांना मिळालेला नाही.अशा परिस्थितीत दैनंदिन खर्च कसा भागवायचा याची चिंता पालकांना आहे.अशा परिस्थितीत शाळा-महाविद्यालयांनी शालेय शुल्क भरण्यासाठी पालकांकडे तगादा सुरू केला आहे.तसेच,आभासी वर्ग सुरू करुन मोबाईल-टॅब खरेदीसाठी सूचना केल्या जात आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क माफ करण्याबाबत तात्काळ निर्णय घेण्यात यावा.तसेच देणग्या अथवा विकास निधीबाबत पालकांना शाळा प्रशासनाने वेठीस धरू नये,याची योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे असे विद्यार्थी संघटनेचे अहमदनगर अध्यक्ष विशाल लोंढे यांनी म्हटले आहे.
दरम्यान मुलांचे शालेय वर्ष वाया जावू नये पालकांची अपेक्षा आहे.दरम्यान शाळा सुरू करुन विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल,असा निर्णय राज्य सरकारने सध्यातरी घेवू नये.तसेच शालेय शुल्क भरण्यासाठी पालकांकडे तगादा लावणाऱ्या शाळांवर कारवाई करावी.मुलांचे वर्ष वाया जाणार नाही.याचाही सरकारने विचार करावा अशी मागणी पालक संघटनांकडून होत आहे.त्यामुळे राज्य सकारने शाळांबाबत निर्णय घेताना पालक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करावी अशी मागणीही संघटनेचे कोपरगाव तालुकाध्यक्ष शुभम शिंदे यांनी शेवटी केली आहे.
Leave a Reply