संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषद हद्दीत प्रभाग क्रमांक एक मधील येवला रस्ता येथील हॉटेल नटराज ते बालाजी कंपाऊंड हा रस्ता नागरिकांसाठी खूपच असुरक्षित बनला असून या रस्त्यावर वर्तमानात होणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाऊस होऊन रस्तावर पाणी साचून अपघातास निमंत्रण देणारा ठरला असून या रस्त्याचे काँक्रीटीकरण त्वरित करा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनीं कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचेकडे एका निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे.
त्यांनी आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,”आमचा परिसर हा नगरपरिषद हद्दीत असून हा परिसर या परिसरातील नागरिकांच्या प्रवासासाठी महत्वपूर्ण असून या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते.हा रस्ता वर्तमान स्थितीत खूपच खराब झाला आहे.साचलेल्या पाण्यात खड्डे दिसत नसल्याने अनेक अपघात होत आहे. काँक्रिटीकरण झाल्यास अपघात टळून नागरिकांची जीवित व वित्तीय हानी टळेल तरी या रास्त्याचे काम त्वरित मार्गी लावावे असेही त्यांनी आपल्या निवेदनात शेवटी म्हटलें आहे.
निवेदनावर चांगदेव घुमरे,प्रकाश घोडेराव,योगेश सोनवणे,हरदेवराव झाबरमल,अशोक देवासी,राजेश छत्रबंद,चंदूराम थोरात,प्रवीण मुळे,राजेंद्र वाडेकर,लिलाबाई घोलप,नामदेव वाडेकर,आदींच्या सह्या आहेत.
Leave a Reply