संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रत्येक “शनिवारी जनता संचारबंदी” च्या दिवशी सर्वच शहरवासीयांनी संचारबंदीचे पालन मनापासून करणे आवश्यक आहे.त्या दिवशी सर्व डॉक्टर्स,हॉस्पिटल्स,औषधालाये बंद ठेवणे गरजेचे असल्याचे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेने केले आहे.
अद्यापही काही तरुण व नागरिक मुखपट्या बांधण्यास टाळाटाळ करताना दिसत आहे.शहरात नागरिक या नियमांचे पालन करताना दिसत नाही दुर्दवी बाब आहे.शहरातील इंडियन मेडिकल असोसिएशनने शहरातील सर्व डॉक्टर्सना शनिवारी पुर्ण टाळेबंदी ठेवण्याची सूचना केली आहे.एखादा गंभीर रुग्ण आल्यास एखादे रुग्णालय किंवा डॉक्टर व औषधालय उघडता येईल.कुणीही बाहेगावच्या रुग्णांना शनिवारची निर्धारण वेळ देऊ नये-आवाहन
कोरोना विषाणूने जगभर कहर उडवून दिला आहे.देशभरात आज ०९ हजार ९०९ रुग्णांची वाढ होऊन बाधित रुग्णांचा आकडा १२ लाख ०३ हजार ९९२ वर गेला आहे व कोरोना बाधित नागरिकांच्या मृत्यूची संख्या २८ हजार ८७५ वर जाऊन पोहचली आहे तर राज्यात बाधित रुग्णांचा आकडा ३ लाख २७ हजार ०३१ वर जाऊन पोहचला आहे तर राज्यात कोरोना बाधितांचा मृत्यू १२ हजार २७६ वर जाऊन पोहचला आहे.नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ०१ हजार ९१८ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ३८ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.अलीकडील काही दिवसात बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.यात जेष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीयरित्या असली तरी चाळीशीच्या वर असलेल्या नागरिकांनाही या साथीत बळी पडावे लागत आहे.विशेषतः कोपरगाव शहरात कोरोनाची संकट हे उपचार करणाऱ्या डॉक्टरवर व परीचारिकांवर जास्त प्रमाणात जास्त प्रमाणावर कोसळत आहे.तालुक्यात सुरेगावात उच्चांक झालेला आहे.त्या पाठोपाठ करंजी,रवंदे,धारणगाव आदी ठिकाणी हा संसर्ग वाढला आहे.अशा परिस्थिती नागरिकांनी स्वतःहून काळजी घेणे अपेक्षित आहे.मात्र त्या पातळीवर नागरिकांत शुकशुकाट दिसत असल्याने काळजी वाढली आहे.
अद्यापही काही तरुण व नागरिक मुखपट्या बांधण्यास टाळाटाळ करताना दिसत आहे.शहरात नागरिक या नियमांचे पालन करताना दिसत नाही दुर्दवी बाब आहे.शहरातील इंडियन मेडिकल असोसिएशनने शहरातील सर्व डॉक्टर्सना शनिवारी पुर्ण टाळेबंदी ठेवण्याची सूचना केली आहे.एखादा गंभीर रुग्ण आल्यास एखादे रुग्णालय किंवा डॉक्टर व औषधालय उघडता येईल.कुणीही बाहेगावच्या रुग्णांना शनिवारची निर्धारण वेळ देऊ नये.कारण,बाहेरगावहून कोरोनाबाधित रुग्ण आला तर सर्व शहरवासीयांना धोका निर्माण होऊ शकतो.कोपरगाव शहरातील ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशा बड्या व्यावसायिकानीही आपापले व्यवहार-व्यवसाय काही काळासाठी स्वतःहुन बंद ठेवायलाही काही हरकत नाही.कारण सुरक्षित अंतर पाळूनच आपण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखू शकतो.शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला तर कोपरगाव शहर जास्त कालावधीसाठी बंद करावे लागू शकते.तसा धोका निर्माण झाला असल्याने शहरवासीयांच्या जीविताच्या सुरक्षिततेसाठी हे पालिकेने आवाहन केले आहे.
Leave a Reply