कोपरगावात मुखपट्या नाही,अनेकांवर गुन्हे

कोपरगावात मुखपट्या नाही,अनेकांवर गुन्हे

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरांतील कोरोना साथींच्या पार्श्वभूमीवर बेशिस्त नागरिकांना सरळ करण्यासाठी कोपरंगाव शहर पोलीसांनी विविध ठिकाणी विविध तीन दिवशी केलेल्या कारवाईत अकरा जणांवर गुन्हे दाखल केले आहे.त्यामुळे बेजबाबदार नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

कोपरगाव शहरात सध्या कोरोना साथीचे अनेक रुग्ण आढळून आले होते.त्यावर उपचार सुरु होते.ते नुकतेच निरंक आले असले तरी नजीकचे येवला,वैजापूर,सिन्नर,नाशिक,नगर,औरंगाबाद,संगमनेर आदी शहरे मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहे.त्यामुळे धोका वाढला आहे.या खेरीज कोपरगाव तालुक्यात वर्तमानात कोपरगाव शहरात सलग कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोपरगाव शहरात सध्या कोरोना साथीचे अनेक रुग्ण आढळून आले होते.त्यावर उपचार सुरु होते.ते नुकतेच निरंक आले असले तरी नजीकचे येवला,वैजापूर,सिन्नर,नाशिक,नगर,औरंगाबाद,संगमनेर आदी शहरे मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहे.त्यामुळे धोका वाढला आहे.या खेरीज कोपरगाव तालुक्यात वर्तमानात कोपरगाव शहरात सलग कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या खेरीज,सुरेगाव,वेळापूर,करंजी,रवंदे येथे कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहे.त्यामुळे साथ पसरण्याचा धोका वाढलेला आहे.त्यामुळे नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करणे आवश्यक आहे.मात्र अद्यापही काही नागरिक आपल्या बेजबाबदार प्रवृत्तीचे प्रदर्शन घडवत आहेत.त्यामुळे अन्य नागरिकांच्या आरोग्यास धोका उत्पन्न होऊ शकतो.मात्र जेंव्हा अशा नाठाळ नागरिकांना प्रशासनाची संकेतांची भाषा कळत नाही त्यावेळी पोलिसांना आपल्या दंड्याचे काम नाईलाजाने सुरु करावे लागते.तीच परिस्थिती वर्तमानात उद्भवली आहे.

त्यामुळे पोलिसानी गत तीन दिवसात केलेल्या कारवाईत बेजबाबदारीचे प्रदर्शन करताना आरोपी चालक रविंद्र विश्वनाथ बागुल (वय-४२) वर्षे रा.टिळकनगर कोपरगांव,अमोल राजेंद्र बागुल (वय-२४) वर्षे रा.सदर,राजेंद्र कोंडाजी नरोडे वय 56 वर्षे रा.शिवाजी रोड कोपरगांव,भगवान शिवप्रकाश जैस्वाल,(वय-३२)रा.भिवधानोरा,ता.गंगापूर,सचिन साळुबा राजगुरु (वय-२८),अमोल साळुबा राजगुरु (वय-३१),युसुफ महम्मद शेख (वय-४२),बबलु शब्बीर पठाण (वय-२४),शब्बीर गुलाब पठाण (वय-४७ वर्षे ),जफऱ शब्बीर पठाण (वय-२६ वर्षे ),अमन जावेद तांबोळी (वय-१९) सर्व रा मावळा चौफुली इंदिरानगर कोपरगाव आदी अकरा जणांवर कारवाई केली आहे.यांनी वरील क्रमांकाच्या विविध दुचाकी,चारचाकीवरून प्रवास करताना कोरोना विषाणूची साथ पसरण्याचा धोका असतानाही आपल्या तोंडावर मुखपट्या न बांधता व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करताना मोकटपणे फिरताना आढळून आले आहे.त्यांच्या विरुद्ध फिर्यादी पोलिसानी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम १८८(२),२६९,२७0,290 प्रमाणे मोटार वाहन कायदा कलम-१८५ प्रमाणे विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.या कारवाईत एका पत्रकार मित्रांला पोलिसानी केलेल्या पाचशे रुपयांच्या दंडाचा समावेश आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड सह अन्य अधिकारी हे करीत आहेत.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Alex Lorel

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua veniam.