शहरी फेरीवाला,पथविक्रेता सूक्ष्म कर्ज पतपुरवठा सुरु

शहरी फेरीवाला,पथविक्रेता सूक्ष्म कर्ज पतपुरवठा सुरु

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषद अंतर्गत केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री स्वनिधी शहरी फेरीवाला,पथविक्रेता सूक्ष्म-पतपुरवठा या वैयक्तिक कर्ज योजनेची अंमलबजावणी सुरु झाल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

पथविक्रेत्यांना कोविडमुळे उध्दभवलेल्या परिस्थितीमुळे पथविक्रेते यांचे उद्योग व्यवसाय बंद झाल्या सारखेच आहे.त्यामुळे पथविक्रेते यांना आपला व्यवसाय सुरळीत ठेवण्यासाठी भांडवलाचा पतपुरवठा बँका मार्फत प्रदान करणेबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत.शहरी फेरीवाला,पथविक्रेता यांना सूक्ष्म-पतपुरवठा करण्यासाठी मार्गदर्शक सुचने प्रमाणे पात्र लाभार्थींना बँकेमार्फत प्रती लाभार्थी रुपये १० हजार इतके कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

केंद्र व राज्य शासन,नगर विकास विभाग यांच्या आदेशाने कोपरगाव नगरपरिषद,दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभागा आणि मार्केट विभाग यांच्या मार्फत शहरातील पथविक्रेते यांचे कायम,हंगामी, व तात्पुरते या गटात बायोमॅट्रिक पद्धतीने सर्वेक्षण दिनांक १ ऑगस्ट २०१९ ते ३१ जानेवारी २०२० या दरम्यान करण्यात आले होते.या सर्वेक्षणामध्ये एकूण १०४६ पथविक्रेते यांची नोंदणी झाली होती.पथविक्रेत्यांना कोविडमुळे उध्दभवलेल्या परिस्थितीमुळे पथविक्रेते यांचे उद्योग व्यवसाय बंद झाल्या सारखेच आहे.त्यामुळे पथविक्रेते यांना आपला व्यवसाय सुरळीत ठेवण्यासाठी भांडवलाचा पतपुरवठा बँका मार्फत प्रदान करणेबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत.शहरी फेरीवाला,पथविक्रेता यांना सूक्ष्म-पतपुरवठा करण्यासाठी मार्गदर्शक सुचने प्रमाणे पात्र लाभार्थींना बँकेमार्फत प्रती लाभार्थी रुपये १० हजार इतके कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.सदर प्रमाणे वितरीत झालेल्या कर्ज प्रस्तावांना ७% व्याज अनुदान लाभार्थीनी नियमित कर्जाची परत फेड केल्यास दर तिमाही व्याज अनुदानाचा लाभ मिळणार आहे.
आज अखेर ७४ फेरीवाले यांनी http://pmsvanidhi.mohua.gov.in या पोर्टलवर स्वतः अॅन्ड्रॉइड मोबाइलने तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर मार्फत अर्ज भरलेले आहे.त्यापैकी ५ फेरीवाल्यांचे प्रस्ताव बँक ऑफ इंडियाच्या कोपरगाव शाखेने मंजूर आहे.बाकी फेरीवालेयांनी प्रथम आपले आपल्या आधारकार्ड सोबत आपला मोबाइल नंबर जोडलेला असल्याची खात्री करावी.किंवा नसल्यास आपल्या आधारकार्ड सोबत मोबाईल जोडणी करून घ्यावा.सदर मोबाईल नंबरच्या आधारे पोर्टलवर लॉगीन करून प्राप्त सूचनांच्या आधारे आपला अर्ज भरत असतांना आधारकार्ड नंबर,फेरीवाला गट निवडीसाठी आपल्या शहरातील सर्वेक्षण यादीनुसार एकूण १०४६ फेरीवाले यांनी आपले अर्ज भरतांना (व्हेंडर कॅटेगरी) “बी” या पर्याय निवडावा. व त्यानंतर आपले सविस्तर माहिती,बँक, आय.एफ.एस.सी. कोड,खाते नंबर,दोन परिचित व्यक्तींची नावे मोबाईल नंबर,पत्ता,बँक निवड आदी माहिती नोंद करावी.भरलेला अर्ज बाद होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन मुख्याधिकारी तथा पीएम स्वनिधी शहरी फेरीवाला,पथविक्रेता अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष यांनी केले आहे.

भरलेल्या अर्जाची पडताळणी बँका त्यांना प्राप्त परिपत्रकानुसार करून ऑनलाईन पद्धतीनेच सदर अर्जाला मान्यता देवून कर्जाचे वितरण करणार आहे. दरमहा नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थीलाच तीनमाही ७% व्याज अनुदान लाभ मिळेल.तसेच फेरीवाल्यांनी आपला दैनदिन व्यवहार करतांना ग्राहकांकडून डिजिटल पेमेंट या माध्यमाचा वापर केल्यास रु.५० ते १०० याप्रमाणे दरमहा परतावा मिळेल.या सर्व प्रक्रिया दरम्यान फेरीवाले यांना काही अडचण वाटल्यास नगरपरिषदेच्या मार्केट विभाग प्रमुख योगेश्वर खैरे,राजेन्द्र गाढे,चंद्रकांत साठे अथवा डे-एन.यु.एल.एम. विभागाचे शहर अभियान व्यवस्थापक महारुद्र गालट,रामनाथ जाधव यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Alex Lorel

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua veniam.