संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य आबाधित राखण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र महत्वाचा दुवा असून या प्राथमिक आरोग्य केंद्रातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून अधिकाऱ्यांनी त्या द्याव्यात असे आवाहन प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथे जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्ती कामाचे भूमिपूजन व जिल्हा परिषद शाळा अंचलगाव येथे जिल्हा नियोजन २०१९-२० अंतर्गत जिल्हा परिषद शाळा खोलीचे कामाचे भूमिपूजन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले या प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी सभापती पौर्णिमा जगधने,रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य कारभारी आगवन,जिल्हा परिषद सदस्य विमल आगवन,उपसभापती अर्जुन काळे,जिनिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब बारहाते,सुधाकर रोहोम,संजय आगवन,राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,अंचलगावच्या सरपंच सुनीता शिंदे,दहेगावच्या सरपंच साधना देशमुख,उपसरपंच अजय सरोदे,सांडूभाई पठाण,सुखदेव शिंदे,पोपटराव शिंदे,सुनील जाधव,सतीश शिंदे,नितीन शिंदे,प्रकाश गायके,ज्ञानेश्वर शिंदे,अशोक शिंदे,दादा बनसोडे,राजेंद्र खिलारी,जगन बागल,अनिल वलटे,गुलाबराव देशमुख,डॉ.भागवत,भास्कर वलटे,दादासाहेब काकडे,अरुण वलटे,उपअभियंता उत्तम पवार,कनिष्ठ अभियंता राजेंद्र दिघे,केंद्रप्रमुख विद्या भोईर,मुख्याध्यापक सदाशिव म्हसाळ,ग्रामसेवक बागुल,कॉन्ट्रॅक्टर देशमुख,दिलीप दाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की,विकासकामांच्या माध्यमातून जनसेवा करत असतांना जिल्हा परिषद,पंचायत समिती सत्ता बदल झाल्यानंतर ग्रामीण भागातील नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्ण करू शकलो याचे समाधान आहे.कोरोनाच्या संकटात जरी निधीची उणीव भासणार असली तरी भविष्यात कोणतीही विकासकामे रखडणार नाहीत यासाठी प्रयत्न करणार आहे.अंचलगाव पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव तातडीने मंजूर व्हावा यासाठी पाठपुरावा सुरु आहे.नकाशावर नसलेले रस्ते नकाशावर घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेत कोपरगाव मतदार संघातील अनेक रस्ते नकाशावर आलेच नाहीत.विधानसभा निवडणुकीनंतर नकाशावर नसलेल्या रस्त्यांना नकाशावर घेण्यासाठी प्राधान्य देत जवळपास पाचशे रस्ते नकाशावर आणले असल्याचा दावा केला आहे. जेव्हा हे काम पूर्ण होईल त्यावेळी मतदार संघाचा नवीन चेहरा मोहरा बदलणार आहे. असा दावाही त्यांनी शेवटी केला आहे.
Leave a Reply