संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कारवाडी ग्रामपंचायत हद्दीत बारेवर लोखंडी पिंजरा ठेवण्याच्या कारणावरून काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास झालेल्या भांडणात आरोपी गोरख सोपान कोकाटे,जिजाबाई सोपान कोकाटे,पूनम गोरख कोकाटे,सुनील सूर्यभान कोकाटे,सुवर्णा सुनील कोकाटे,सूर्यभान दीपाजी कोकाटे,परिगा सूर्यभान कोकाटे,अनिल एकनाथ कोकाटे,मोनाली अनिल कोकाटे,पंकज दिलीप कोकाटे,किसनाबाई दिलीप कोकाटे,मीरा पंकज कोकाटे,मारुती दिलीप कोकाटे आदी तेरा जणांविरुद्ध फिर्यादी महिला सीमा अमृतराव कोकाटे यांनी गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे कारवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी आपल्या दप्तरी गु.र.नं.१६६/२०२० भा.द.वि.कलम १४३,१४७,५०४,५०६,१८८,२६९,२७० प्रमाणे आरोपी गोरख सोपान कोकाटे,जिजाबाई सोपान कोकाटे,पूनम गोरख कोकाटे,सुनील सूर्यभान कोकाटे,सुवर्णा सुनील कोकाटे,सूर्यभान दीपाजी कोकाटे,परिगा सूर्यभान कोकाटे,अनिल एकनाथ कोकाटे,मोनाली अनिल कोकाटे,पंकज दिलीप कोकाटे,किसनाबाई दिलीप कोकाटे,मीरा पंकज कोकाटे,मारुती दिलीप कोकाटे आदी तेरा जणांविरुद्ध फिर्यादी महिला सीमा अमृतराव कोकाटे यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून आपल्याला व साक्षीदार रंजना अमृतराव कोकाटे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.यावरून पोलिसानी आपल्या दप्तरी गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एम.ए. कुसारे हे करीत आहेत.
Leave a Reply