संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्य सहा उत्सवापैकी महत्वाचा मानला जाणारा “गुरुपूजन उत्सव” कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात संपन्न केला आहे.
भारतीय संस्कृतीत आदर्श व्यक्तीला गुरु मानण्याची प्रथा आहे.मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ.केशव बळीराम हेगडेवार यांनी मात्र राष्ट्रध्वजालाच गुरु मानण्याची प्रथा सुरु केली.त्यांच्या म्हणण्या नुसार व्यक्ती म्हणून गुरूला जेंव्हा यश मिळते तेंव्हा त्यात काही दोष निर्माण होऊ शकतात.मात्र भगवा ध्वज हा मात्र त्यागाचे प्रतीक आहे.त्याच्याकडे पाहिल्यावर माणसाच्या मनातील विकार नाहीसे होतात.उगवता सूर्य हा उगवताना भगवाच असतो.म्हणूच आपल्या प्राचीन राज्यांनी भगवाच आपला राष्ट्रध्वज मानला त्यावरील चिन्हे भलेही वेगवेगळे असतील मात्र रंग मात्र भगवाच ठेवला होता.म्हणून हा उत्सव संघ साजरा करतो.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात “भगव्या ध्वजाला”गुरू मानतात व त्याचे पुजन करून हा उत्सव साजरा करण्याची प्रथा सुरु आहे.या वर्षी कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात हा उत्सव सर्व शासकीय नियम पाळून साजरा करण्यात आला.शहरातील अनेक व्यावसाईक तसेच तरुण स्वयंसेवकांनी चार-चार च्या गटाने येवून धवजपूजन केले व समर्पण केले.येणाऱ्या प्रत्येक स्वयंसेवकाला मुखपट्टी लावून व प्रतिबंधात्मक औषधे लावूनच पुजन करण्यास परवानगी देण्यात आली होती.यावेळी होमिओपॅथीचे “आर्सेनिक अल्बम-३०” या गोळ्यांचे देखील वाटप करण्यात आले.सदर कार्यकर्मासाठी कोपरगाव शहरातील अनेक स्वयंसेवक उपस्थित होते.संघाच्या प्रार्थनेद्वारे कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला आहे.
Leave a Reply