संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.शंकरराव चव्हाण यांनी ५० वर्षाच्या राजकीय,सामाजिक,शिक्षण क्षेत्रात आदर्शवत कार्य केले त्यांनी पाटबंधारे मंत्री म्हणून प्रदीर्घ काम केले.त्यांच्या काळात ३१ मोठ्या धरणांपैकी निम्मे धरणे उभारली गेली होती खऱ्या अर्थाने ते महाराष्ट्राचे आधुनिक भगीरथ होते असे गौरोवोद्गार कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना काढले आहे.
पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली.कृष्णा-गोदावरी पाणी तंट्यात त्यांची भूमिका वाखाणण्यासारखी आहे. गोदावरी, पूर्णा आणि मांजरा या धरणांद्वारा त्यांनी मराठवाड्याचा विकास घडवून आणला. जायकवाडी प्रकल्प हा शंकररावजींच्याच प्रयत्नाचे मोठे फळ आहे. भ्रष्टाचाराचे निर्मूलन,अधिक कार्यक्षम प्रशासन,१० लाख टनांहून अधिक धान्य उत्पादन वगैरे त्यांची धोरणे आहेत.कोणताही राजकीय प्रश्न ते समझोत्याने सोडवित असत-अशोक रोहमारे
राज्याचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी सांगता समारंभ कोपरगावात के.जे.सोमय्या महाविद्यालयात नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते चंद्रशेखर कुलकर्णी हे होते.सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील शिंदे,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष माधवराव खिलारी,राहुल रोहमारे,संदीप रोहमारे,सुजित रोहमारे,महाविद्यालयाचे प्राचार्य बी.एस.यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते रोहमारे म्हणाले,”पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली.कृष्णा-गोदावरी पाणी तंट्यात त्यांची भूमिका वाखाणण्यासारखी आहे. गोदावरी, पूर्णा आणि मांजरा या धरणांद्वारा त्यांनी मराठवाड्याचा विकास घडवून आणला. जायकवाडी प्रकल्प हा शंकररावजींच्याच प्रयत्नाचे मोठे फळ आहे. भ्रष्टाचाराचे निर्मूलन, अधिक कार्यक्षम प्रशासन, १० लाख टनांहून अधिक धान्य उत्पादन वगैरे त्यांची धोरणे आहेत.कोणताही राजकीय प्रश्न ते समझोत्याने सोडवित असत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मे १९७५ मधील संप ज्या पद्धतीने त्यांनी हाताळला. चव्हाण यांच्या काळात महाराष्ट्रातील ३१ मोठ्या धरणांपैकी निम्मे धरणे पूर्ण झाली त्यात उजनी,काळधारण (कोंकण),विष्णुपरी,पैनगंगा प्रकल्प,जायकवाडी ही प्रमुख धरणे आहेत, पाण्याच्या संदर्भात त्यांना भविष्यातील आव्हाने माहिती होती.पिण्याचे पाणी आणि उद्योग,शेती यांना केंद्रस्थानी ठेवून ही धरणे उभारली गेली.पाण्याच्या प्रश्नी त्यांनी शास्त्रशुद्ध अभ्यास केला म्हणून त्यांना आधुनिक भगीरथ समजले गेले असेही ते शेवटी म्हणाले.या वेळी संस्थेचे विश्वस्त अशोक खांबेकर यांनी प्रास्तविकात माजी मुख्यमंत्री कै.शंकररावजी चव्हाण यांच्या कार्याची माहिती दिली.
महाराष्ट्राचे दोनदा मुख्यमंत्री,२० वर्षे पाटबंधारे मंत्री,केंद्रीय गृहमंत्री,शिक्षणमंत्री,संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी देशभरात आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा निर्माण केला होता. राजकारणातील एक देवमाणूस म्हणून त्यांचा लौकिक होता असे कोपरगाव तालुका एज्यूकेशन सोसायटीचे महासचिव ऍड. संजीव कुलकर्णी यांनीं शेवटी सांगितले आहे.उपस्थितांचे आभार संस्थेचे विश्वस्त संदीप रोहमारे यांनी मानले आहे.
Leave a Reply