संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून देर्डे कोऱ्हाळें ग्रामपंचायत हद्दीतून दि.५ जुलै रोजी काहीही न सांगता एकोणाविस वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे.तर दुसऱ्या घटनेत कोपरगाव नजीक असलेल्या सोनार वस्ती या ठिकाणाहून १२ जुलै रोजी एकोणाविस वर्षीय तरुणी घरात कोणालाही काही न सांगता बेपत्ता झाली आहे.या दोन्ही घटनांनी तालुक्यात खळबळ उडाली आहे.
शहरात बेपत्ता मुले-मुलींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुलांचे अपहरण करून त्यांना भीक मागायला लावण्याचे आणि अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकलण्याचे प्रकार वाढत आहेत. काहीवेळेस पोलिस अपहरणकर्त्याचा डा weव उधळून लावतात. मात्र, काही दिवसांनी अपहरणकर्ते पुन्हा सक्रिय झालेले दिसतात. बेपत्ता मुलांचा शोध घेण्याच्या बाबतीत अनकेदा पोलिसही ढिलाई दाखवतात. बेपत्ता मुलांच्या वाढत्या संखेबद्दल न्यायालयानेही पोलिसांना अनेकदा फटकारले आहे.
पहिल्या घटनेत देर्डे-कोऱ्हाळें येथील मुलीच्या पित्याने आपली एकोणाविस वर्षीय मुलगी हरविल्याच्या तक्रार दाखल केली आहे.त्यांनी आपली मुलगी दि.५ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास काही न सांगता निघून गेली आहे.या बाबत जवळच्या नातेवाईकांकडे शोध घेऊनही ती मिळून आली नाही.अखेर कंटाळून त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.तर दुसरी घटना हि कोपरगाव नजीक सोनार वस्ती येथे घडली असून ती रविवार दि.१२ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे.या प्रकरणी बेपत्ता मुलीच्या आईने आपली मुलगी घरात कोणालाही काही न सांगता बेपत्ता झाली असल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.या बाबत जवळच्या नातेवाईकांकडे शोध घेऊनही ती सापडली नाही.त्यामुळे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी आपल्या दप्तरी हरविल्याच्या पुस्तिकेत नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार महेश कुसारे व दुसऱ्या घटनेत पो.हे.कॉ.अशोक आंधळे हे करीत आहेत.
Leave a Reply