संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात भर संभाजी चौकात रात्री १७ मार्च २०२० रोजी मोरे कॉम्प्लेक्स या ठिकाणी असलेल्या कोठारी सेल्स कॉर्पोरेशन या ठिकाणी सव्वा आठ वाजेच्या सुमारास दरोडा पडून त्यांच्यावर व त्यांच्या नोकरांवर गावठी पिस्तूल रोखून त्यांच्याकडील सत्तर हजार रुपयांची रोकड पळवून नेणाऱ्या टोळीच्या मुसक्या कोपरगाव शहर पोलिसानी आवळल्या असून हे दरोडेखोर आठ असल्याचे निष्पन्न झाले असून त्या सराईत गुन्हेगारांना पोलिसानी बेड्या ठोकल्या आहे.त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोपरगाव शहरात संभाजी चौकात असलेल्या मोरे कॉप्लेक्स या ठिकाणी प्रवीण शोभाचंद कोठारी (वय-६०) रा.कृषिमित्र सोसायटी,इंदिरा पथ यांच्या मालकीचे कोठारी मार्केटिंग व कोठारी सेल्स कॉर्पोरेशन या नावाचे दुकान आहे.हे सायंकाळी ८.२० वाजता आपले दुकानाचा दिवसभराचा व्यवसायाचा हिशेब आपल्या नोकरांकडून घेत असताना अचानक काही दरोडेखोर आपली तोंडे बांधलेल्या स्थितीत व हातात गावठी पिस्तूल घेऊन समोरच बसलेल्या नोकरांना धमकावून त्यांच्या कडील रोख हिशेबाची सत्तर हजारांची रक्कम ताब्यात घेऊन आत बसलेले दुकानांचे मालक यांच्या केबिन मध्ये पिस्तूल रोखुन जात असताना व झटपट होत असताना गोंधळ उडाल्याने त्यांना अचानक आपला जीव वाचविण्यासाठी पळून जावे लागले होते.
सदरचे सविस्तर वृत्त असे की.कोपरगाव शहरात संभाजी चौकात असलेल्या मोरे कॉप्लेक्स या ठिकाणी प्रवीण शोभाचंद कोठारी (वय-६०) रा.कृषिमित्र सोसायटी,इंदिरा पथ यांच्या मालकीचे कोठारी मार्केटिंग व कोठारी सेल्स कॉर्पोरेशन या नावाचे दुकान आहे.हे सायंकाळी ८.२० वाजता आपले दुकानाचा दिवसभराचा व्यवसायाचा हिशेब आपल्या नोकरांकडून घेत असताना अचानक काही दरोडेखोर आपली तोंडे बांधलेल्या स्थितीत व हातात गावठी पिस्तूल घेऊन समोरच बसलेल्या नोकरांना धमकावून त्यांच्या कडील रोख हिशेबाची सत्तर हजारांची रक्कम ताब्यात घेऊन आत बसलेले दुकानांचे मालक यांच्या केबिन मध्ये पिस्तूल रोखुन जात असताना व झटपट होत असताना गोंधळ उडाल्याने त्यांना अचानक आपला जीव वाचविण्यासाठी पळून जावे लागले होते.दरम्यान गोंधळ उडाल्याने व नागरिक जमा होऊ लागल्याने त्यांना आपला खेळ आवरून घ्यावा लागला होता.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दुकांनाचे मालक प्रवीण कोठारी यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.१०५/२०२० भा.द.वि.कलम ३९५ प्रमाणे तसेच आर्म ऍक्ट ३/२५,४/२५ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.दरम्यान आरोपी फरार झाले होते.त्यानंतर या दुकानातील व नजीकच्या चलचित्रण चित्रफितींचा अभ्यास करून पोलिसानी काही संशयितांना ताब्यात घेतले होते.व त्यांना हिसका दाखवताच त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली होती.त्यामुळे अन्य आरोपीना शोधणे सोपे गेले असून त्यात अट्टल गुन्हेगार सामील असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यात काहींवर दरोडे,रस्ता लूट,खून आदींचे २५/३० गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यात आरोपी नवनाथ साहेबराव गोर्डे (वय-३२) रा.पोहेगाव ता.कोपरगाव याने नक्षीकाम असलेली जीन्स पॅन्ट शोधासाठी निर्णायक ठरली आहे.दरम्यान यात आणखी आरोपी किरण उर्फ अँथोनी छगन सोनवणे (वय-३२) रा.पेठ रोड आर.टी. ओ. कार्यालयाजवळ अश्वमेधनगर,नाशिक.बाळासाहेब शिवाजी पगारे (वय-२०) रा.शिंगवे ता.राहाता,विकी विष्णू चावरे (वय-२९) रा.खंडोबा गल्ली राहाता,यात गोर्डे वगळता तीघांना पोलिसानी २६ जून रोजी जेरबंद केले आहे.तर त्यानां कोपरगाव वरिष्ठ न्यायालयाने पोलिसी कोठडीत रवानगी केली आहे.आरोपी बाळासाहेब पगारे व विकी चावरे यांना मात्र सी.आर.पी.सि.१६९ मधून वगळण्यात आले आहे.या खेरीज पाचवा आरोपी सागर चंद्रकांत बनसोडे (वय-२४) रा.साकुरी बनसोडे वस्ती,ता.राहाता यास २८ जून रोजी अटक केली असून तो न्यायालयीन कोठडीत आहे.या खेरीज नारायण रामप्रसाद बसनेत (वय-२७) रा.गवारे चाळ,हनुमावाडी,पंचवटी नाशिक,शरद गोटीराम फुलारी (वय-२५) रा.पोहेगाव ता.कोपरगाव.यास ३० जून रोजी जेरबंद केले आहे.तो ४ जुलै पासून न्यायालयीन कोठडीत आहे.तर आठवा आरोपी हा अनिल ज्ञानदेव शिंदे (वय-२३) रा.काठेवाडी रयत शाळेंजवळ,पुणतांबा ता.राहाता.यास १० जुलै रोजी अटक करण्यात आली आहे.आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेल्या वस्तु जप्त करण्यात आल्या आहेत.त्या अंगझडतीत एक भ्रमणध्वनी,एक ३.५० लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची मारुती एर्टीगा कार (क्रमांक एम.एच.१७ बी.व्ही.६८८७),दोन गावठी कट्टे,दोन दुचाकी,लोखंडी चॉपर आदी साहित्य जप्त केले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे करीत आहेत.त्यांनी या कामी चांगलीच मेहनत घेतल्याचे उघड झाले आहे.या घटनेने कोपरगावसह तालुक्यात खळबळ उडाली होती.यातील बहुतांशी आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत.
Leave a Reply