संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपारगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या माळवाडी या उपवाडीत आत्मामालिक ध्यानपीठ कर्मचारी वसाहतीत रहिवाशी असलेल्या एका चोवीस वर्षीय तरुणी कु.उज्वला भगवान शेळके हिने पढविचे लोखंडी अंगलला आपल्याच ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.या प्रकरणी भगवान बाबुराव शेळके (वय-५५) धंदा नोकरी आत्मा मलिक ध्यानपीठ यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यात कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत जंगली महाराज आश्रमात आत्मा मलिक कर्मचारी वसाहतीत रहिवाशी व नोकरीत असलेले भगवान बाबुराव शेळके हे आपली पत्नी,दोन मुली असे कुटूंबासमवेत राहतात.त्यांतील एक चोवीस वर्षीय मुलगी कु.उज्वला भगवान शेळके हिने आज पहाटेच्या अडीच वाजेच्या सुमारास नैसर्गिक विधीच्या निमित्ताने घरातून बाहेर आली व तिने कोणालाही काही न सांगता बाहेरील पढवीच्या लोखंडी अंगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला आहे.या बाबत बराच उशीर होऊनही मुलगी घरात का आली नाही याची चौकशी करू जाता त्यांना हि मुलगी घरातून बाहेर आल्यावर पढवित लटकलेल्या अवस्थेत मृत आढळून आली आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी भेट दिली आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी मुलीचा पिता भगवान शेळके यांच्या खबरी वरून अकस्मात मृत्यू र.नं.२७/२०२० सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए.एम.दारकुंडे हे करीत आहेत.
Leave a Reply