संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी भविष्यात अहंम भूमिका निभावणाऱ्या साठवण तलाव क्रमांक पाचचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आ.आशुतोष काळे व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी चंग बांधला असून आज सी.डी.ओ.मेरीच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढण्यासाठी आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
या पूर्वी नगरपरिषदेने या तलावाचे डीझाईन करण्यासाठी आवश्यक असणारे ८.८० लाखांचे शुल्क भरले आहे.तर भू-वैज्ञानिक तज्ञांचे ५.९० लाखांचे शुल्क आधीच पंधरा दिवसांपूर्वी भरण्यात आले आहे.त्यामुळे आता डीझाईन तयार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.या कामी भूवैज्ञानिक यांच्या अहवालाची सि.डी.ओ.मेरिस प्रतिक्षा आहे.या कामाला गती देण्यासाठीच या बैठकीचे आयोजन केले होते.
कोपरगाव शहराचा पाण्याचा प्रश्न हा कृत्रिम टंचाई या व्याख्येत मोडणारा असून उन्हाळ्यात या वर्षी कुठलीही टंचाई निर्माण झाली नाही.व नागरिकांची ओरड हि आली नाही.नगराध्यक्ष विजय वहाडणे हे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर हा मोठा फरक नागरिकांच्या लक्षात आला आहे.तरीही भविष्यात शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता हा प्रश्न उपस्थित होऊ नये या साठी पाच क्रमांकाच्या तलावाचा प्रश्न धसास लावण्याचा प्रयत्न आ. आशुतोष काळे व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी चालविला आहे.या साठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.आज याच प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी साईबाबा कॉर्नर या ठिकाणी महात्मा गांधी प्रदर्शन हॉल येथील सभागृहात या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते.यांनी आज सी.डी.ओ.मेरी या नाशिक येथील संस्थेतील अधिकाऱ्यांची कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांसमवेत ५ क्रमांक साठवण तलावाच्या कामासंदर्भात बैठक घेतली.सदर प्रसंगी नगराध्यक्ष विजय वहाडणे,सी.डी.ओ.मेरीचे अधीक्षक अभियंता श्री.मुंदडा,कार्यकारी अभियंता श्री.विझे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,अभियंता दिगंबर वाघ,अभियंता ऋतुजा पाटील,कर निरीक्षक ज्ञानेश्वर चाकने,मानवसेवा कन्सल्टिंगचे राजेंद्र सनेर,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,शहराध्यक्ष सुनील गंगूले,नगरसेवक वीरेन बोरावके,मंदार पहाडे,संदीप पगारे,प्रतिभा शिलेदार, हिरामण गंगूले,अजीज शेख,गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी आ.आशुतोष काळे यांनी सी.डी.ओ.च्या अधिकाऱ्यांना ५ क्रमांक साठवण तलावाचे डिझाईन लवकरात लवकर बनवून अंदाजपत्रक बनवण्याच्या सूचना दिल्या. तसेच गायत्री कन्स्ट्रक्शनकडून करण्यात आलेल्या खोदकामाची समक्ष पाहणी केली आहे.
Leave a Reply