कोपरगाव-(प्रतिनिधी)कोपरगाव तालुक्यातील रवंदे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या श्री साईसेवा ट्रस्ट व डॉक्टर्स व मेडिकल असोशिअशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरु पौर्णिमा उत्सवानिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले आहे.या शिबिराला नजीकच्या गावातील तरुणांनी उत्साहवर्धक प्रतिसाद दिला आहे.
गुरुपौर्णिमा उत्सव नुकताच देशभर मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार होत.भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली आहे.व्यासांनी वेदांचे नीटपणे विभाजन आणि संपादन केले. पूर्वी वेद एकच होता त्याचे चार भाग व्यासांनी केले.व्यासांनी महाभारत लिहिले “महाभारत” हा जगातील सर्वश्रेष्ठ व अलौकिक ग्रंथ! महाभारतात धर्मशास्त्र आहे,नीतिशास्त्र आहे,व्यवहारशास्त्र आहे आणि मानसशास्त्रही आहे.महाभारताची रचना करणारे व्यास त्या कथेशी फार जवळून संबंधित होते.त्यांचे पूजन या दिवशी मनोभावे करून आपल्या गुरूंना वंदन करण्याची परंपरा भारतात मोठ्या प्रमाणावर आहे.
महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार होत.भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली आहे.व्यासांनी वेदांचे नीटपणे विभाजन आणि संपादन केले. पूर्वी वेद एकच होता त्याचे चार भाग व्यासांनी केले.व्यासांनी महाभारत लिहिले “महाभारत” हा जगातील सर्वश्रेष्ठ व अलौकिक ग्रंथ! महाभारतात धर्मशास्त्र आहे,नीतिशास्त्र आहे,व्यवहारशास्त्र आहे आणि मानसशास्त्रही आहे.महाभारताची रचना करणारे व्यास त्या कथेशी फार जवळून संबंधित होते.त्यांचे पूजन या दिवशी मनोभावे करून आपल्या गुरूंना वंदन करण्याची परंपरा भारतात मोठ्या प्रमाणावर आहे.मात्र या वर्षी कोरोना विषाणूची साथ चालू असल्याने बाकी सोपस्कारांना फाटा देऊन अनेक सामाजिक संस्थांनी रक्तदानासारखे उपक्रम राबवले आहे.रवंदेत साई सेवा ट्रस्ट व डॉक्टर्स व मेडिकल असोशिअशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदानाचा उपक्रम राबविण्यात आला आहे.त्याला तरुणाईने चांगला प्रतिसाद दिला आहे.सदर प्रसंगी डॉ.नितीन झंवर,डॉ.वर्षा झंवर,साईसेवा ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.आयोजकांनी उपस्थित रक्तदात्यांचे आभार मानले आहेत.
Leave a Reply