संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव येथील सूर्यतेज संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमासोबत वृक्षारोपण व पालकत्व गुणात्मक उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनाच प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन वृक्षप्रेमी महादेव डोईफोडे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना राज्यभर राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविली जात आहे. या योजनेमधून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली जाणार आहे. पर्यावरणातील होत असलेले बदल त्याचा शेती व शेती उद्योगावर होत असलेले वाईट परिणाम कमी करण्यासाठी वृक्ष लागवडीचा उपयोग करून घेता येणार आहे.यासाठी वृक्ष लागवडीचे नियोजन व व्यवस्थापन या गोष्टीविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे.
कोपरगाव येथील सूर्यतेज संस्था व इंडियन फार्मर्स फर्टीलायझर को-आँपरेटिव्ह लि.आणि महाराष्ट्र हरितसेना यांचे संयुक्त विद्यमाने सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली स्वच्छ-जलशक्ती-हरित आणि पर्यावरण अभियान २०२० अंतर्गत मोफत कडुनिंब वितरण,वृक्षारोपण व पालकत्व अभियान वृक्षप्रेमी महादेव डोईफोडे,तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांचे शुभहस्ते वृक्षवितरण व पालकत्वाने करण्यात आला आहे.
या प्रसंगी विद्याप्रबोधिनीचे मुख्याध्यापक दत्तात्रेय गवळी,शिशु विकास मंदिर मुख्याध्यापिका सरिताताई कोऱ्हाळकर,ईफको क्षेत्र व्यवस्थापक तुषार गोरड,क्षेत्र सहाय्यक अधिकारी ईश्वर चोखर,वृक्ष पालक पंकज चव्हाण,वैभव कचरे उपस्थित होते.
सूर्यतेजच्या माध्यमातून शैक्षणिक,कला,नाट्य, सांस्कृतिक,स्वच्छता,वृक्षारोपण,सामाजिक,कोपरगांव फेस्टिव्हल,या सारखे अनेक लोकोपयोगी उपक्रम आणि योजना राबवत आहे.सूर्यतेज संस्थेद्वारे सर्व वृक्षप्रेमींच्या सहभागातून शिर्डी उपविभागात गेल्या ५ वर्षात सुमारे ३३ हजाराचे पुढे विविध प्रजातींच्या रोपांचे वितरण,रोपण आणि पालकत्व दिले आहे.
Leave a Reply