संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील धामोरी ग्रामपंचायत वाचनालयात आज सकाळी ग्रामपंचयात मध्ये शिपाई या पदावर कार्यरत असलेले कर्मचारी मोहन आबाजी वाणी (वय-४५) यांनी सकाळी सहा वाजेच्या सुमारास अज्ञात कारणामुळे छताला दोरी बांधून आत्महत्त्या केल्याने तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
कौटुंबिक ताणतणावामुळे मयत वाणी काही दिवसापासून चिंतेत असल्याचे वृत्त आहे.त्यांच्या घराचे काम चालू असल्याने ते ग्रामपंचायतच्या मागील बाजूस असलेल्या जुन्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या एका खोलीत रहात होते.ग्रामपंचायत कार्यालयाची चावी त्यांच्याकडे राहत होती. आज सकाळी ते कोणाचे त्यांच्याकडे लक्ष नाही अशी संधी साधून ते वाचनालयाच्या खोलीत आले व त्यांनी या इमारतीच्या छताला दोरी बांधून खुर्चीचा वापर करून आपली इहलोकीची जीवनयात्रा संपवली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील धामोरी ग्रामपंचायत हि मोठी व सधन ग्रामपंचायत मानली जाते.या ग्रामपंचायतीत जवळपास सात कर्मचारी कार्यरत आहे.यात पंधरा वर्षांपूर्वी सेवेत दाखल होते.त्यांनी आपल्या सेवेची पंधरा वर्ष पूर्ण केली होती.मात्र त्यांच्या कौटुंबिक ताणतणावामुळे ते काही दिवसापासून चिंतेत असल्याचे वृत्त आहे.त्यांच्या घराचे काम चालू असल्याने ते ग्रामपंचायतच्या मागील बाजूस असलेल्या जुन्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या एका खोलीत रहात होते.ग्रामपंचायत कार्यालयाची चावी त्यांच्याकडे राहत होती. आज सकाळी ते कोणाचे त्यांच्याकडे लक्ष नाही अशी संधी साधून ते वाचनालयाच्या खोलीत आले व त्यांनी या इमारतीच्या छताला दोरी बांधून खुर्चीचा वापर करून आपली इहलोकीची जीवनयात्रा संपवली आहे.त्यांना उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयांत भरती करण्यात आले होते.तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्यांना तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पच्छात,आई,पत्नी,दोन मुले,असा परिवार आहे.त्यांच्या या दुर्घटनेबद्दल कोपरगाव ग्रामपंचायत संघटनेने तिव्र दुःख व्यक्त केले आहे.त्यांनीं आत्महत्येचे कारण मात्र कुणालाही सांगता येत नव्हते.
या घटनेची कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रं.३४/२०२० सी.आर.पी.सी. प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.चंद्रकांत तोर्वेकर हे करीत आहेत.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Leave a Reply