संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
गोदावरी कालव्याचे आवर्तन सुरु असतांना पोहेगाव परिसरात कोपरगाव तालुक्यातून वाहणाऱ्या उजव्या कालव्याच्या पाणी गळतीमुळे अडचणी निर्माण होवून त्याचा त्रास कालव्यालगत असलेल्या शेतकऱ्यांना होत होता याबाबत काय उपाय योजना करता येतील याबाबत पाहणी करावी अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्या सूचनेनुसार पाटबंधारे अधिकाऱ्यांनी पोहेगाव,शहापूर परिसरात जावून उजव्या कालव्यामुळे होत असलेल्या नुकसानीची पाहणी केली.
आवर्तन काळात पोहेगाव परिसरात उजव्या कालव्यावर असलेल्या गेजकुंडी मुळे कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होवून कालव्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या जवळपास चार किलोमीटर परिसरातील शेती पिकांचे नुकसान होत होते. तसेच पोहेगाव-वेस मार्गावर असलेल्या पुलावरून जाण्यासाठी भराव नसल्यामुळे वाहनांना हा पूल ओलांडतांना मोठी कसरत करावी लागत होती.त्या मुळे अपघात होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.
आवर्तन काळात पोहेगाव परिसरात उजव्या कालव्यावर असलेल्या गेजकुंडी मुळे कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होवून कालव्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या जवळपास चार किलोमीटर परिसरातील शेती पिकांचे नुकसान होत होते. तसेच पोहेगाव-वेस मार्गावर असलेल्या पुलावरून जाण्यासाठी भराव नसल्यामुळे वाहनांना हा पूल ओलांडतांना मोठी कसरत करावी लागत होती.त्या मुळे अपघात होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.त्याबाबत पोहेगाव व परिसरातील शेतकरी व नागरिकांनी आ.काळे यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या होत्या.त्याबाबत त्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून अधिकाऱ्यांना पोहेगाव परिसरात उजव्या कालव्याबाबत नागरिकांना येत असलेल्या अडचणींची समक्ष जावून पाहणी करण्याच्या सूचना केल्या.
त्यानुसार पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे,उपविभागीय अभियंता प्रशांत ढोकणे,आर.पी.पाटील,सहाय्यक अभियंता महेश गायकवाड,शाखा अभियंता ओंकार भंडारी आदी अधिकाऱ्यांसमवेत पोहेगाव येथे जावून पाहणी केली आहे. यावेळी नंदकिशोर औताडे,राजेंद्र औताडे उपस्थित होते. गळती होत असलेल्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी व पोहेगाव-वेस रोडवर असलेल्या या पुलावर भर टाकण्याबाबत कनिष्ट अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले असल्याचे अभियंता सागर शिंदे यांनी आ.काळे यांची भेट घेवून सांगितले आहे. त्यांच्या पुढाकारातून उजव्या कालव्यामुळे निर्माण झालेला या परिसराचा मागील काही वर्षाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार असून परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे .
Leave a Reply