संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषद येथे उपमुख्याधिकारी पदावर कार्यरत असलेले भारतीय सेनादलात दाखल होऊन सतरा वर्ष सेवा करून निवृत्ती नंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सलग तीन वेळेस वेगवेगळ्या प्रशासकीय सेवेत काम केलेले सुनील भाऊसाहेब गोर्डे यांची नुकत्याच झालेल्या स्पर्धा परीक्षेत लक्षवेधी यश मिळवून कर सहायक पदी निवड झाली आहे.त्यांच्या या निवडीबद्दल आ. आशुतोष काळे,नगराध्यक्ष विजय वहाडणे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व पालिकेतील अधिकारी,नगरसेवक आदींनी त्यांना पुढील सेवेसाठी सदीच्छा दिल्या आहेत.
कोपरगाव नगरपरिषदेत उपमुख्याधिकारी म्हणून मागील दीड वर्षात विधानसभा निवडणुकीत तालुका आचारसंहिता कक्ष प्रमुख,२०१९ साली पुर परिस्थिती नियंत्रक अधिकारी तर स्वच्छ सर्वेक्षण अशा वेगवेगळ्या कामातून आपल्या कामातुन छाप पाडली आहे.नुकत्याच कर सहायक पदासाठी झालेल्या परीक्षेत त्यांना लक्षवेधी यश मिळाले असून कर सहायक पदी सुनील गोर्डे यांची निवड झाली आहे.
सुनील गोर्डे हे नजीकच्या राहाता तालुक्यातील अस्तगाव येथील शेतकरी कुटुंबातील आहे.कष्ट करण्याची करण्याची जिद्द व चिकाटी या माध्यमातून त्यांनी हे यश संपादन केले आहे.सुनिल गोर्डे हे कोपरगाव येथे १५ जानेवारी २००१ रोजी झालेल्या भरतीत भारतीय लष्करात दाखल झाले.३१ जानेवारी २०१८ रोजी सेवानिवृत्त झाले.लष्करात सेवा करत असताना पुणे विद्यापीठातुन हिंदी विषयातुन बी.ए.पदवीधर २०१३ मध्ये मिळवली.सेवानिवृत्ती नंतर सतत १३ महिने जिद्दीने अभ्यास करून कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी,मंत्रालय लिपिक,कर सहायक अशा तीन पदव्या मिळवल्या होत्या.सध्या कोपरगाव नगरपरिषदेत उपमुख्याधिकारी म्हणून मागील दीड वर्षात विधानसभा निवडणुकीत तालुका आचारसंहिता कक्ष प्रमुख,२०१९ साली पुर परिस्थिती नियंत्रक अधिकारी तर स्वच्छ सर्वेक्षण अशा वेगवेगळ्या कामातून आपल्या कामातुन छाप पाडली आहे.नुकत्याच कर सहायक पदासाठी झालेल्या परीक्षेत त्यांना लक्षवेधी यश मिळाले असून कर सहायक पदी सुनील गोर्डे यांची निवड झाली आहे.स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना सुनील गोर्डे यांना कृष्णा गावडे कोल्हापूर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते.त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Leave a Reply