संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील संजयनगर या उपनगरातील दोन गटात घर जागेच्या कारणावरून झालेल्या हाणामारीत फिर्यादी शंकर रमेश गुंजाळ (वय-३८) यांनी आरोपी अशोक रामचंद्र गुंजाळ,कलाबाई बापू शिंदे,सुनील अशोक शिंदे,अनिल अशोक शिंदे,अनिल अशोक गुंजाळ,गणेश अशोक गुंजाळ,ताराबाई अशोक गुंजाळ,आशाबाई सुनील गुंजाळ आदी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या घटनेत हाणामारीत फिर्यादी शंकर गुंजाळ व शिवराज परशुराम गुंजाळ (वय-१७) हे दोघे गंभीररीत्या जखमी झाले आहे.
आरोपी अशोक गुंजाळ व कलाबाई बापू शिंदे हे आज सकाळी फिर्यादीच्या घरासमोर आले व त्यांनी फिर्यादी व फिर्यादीच्या आईला,” तुम्ही घराच्या बाहेर या,हे घर आमचे आहे.तेंव्हा फिर्यादी शंकर गुंजाळ व त्यांची आई हे आरोपी यांना समजावून सांगू लागले असता सुनील अशोक गुंजाळ,अनिल अशोक गुंजाळ,गणेश अशोक गुंजाळ,गणेश अशोक गुंजाळ,ताराबाई अशोक गुंजाळ,आशाबाई सुनील गुंजाळ सर्व रा.टाकळी नाका यांनी फिर्यादी शंकर गुंजाळ यांना शिवीगाळ करत हातातील काठ्यानीं फिर्यादीच्या डोक्यात मारहाण करून जखमी केले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,संजयनगर येथे फिर्यादी शंकर गुंजाळ हे आपल्या आई,पत्नी,बहीण, भाचा व दोन मुले,मुलगी,पुतण्या असे एकत्र राहतात.व मोलमजुरीने कामधंदा करतात.फिर्यादीच्या शेजारी अशोक गुंजाळ यांची जागा होती.त्यांनी ती विकून टाकळी नाका येथे राहण्यास गेले आहे.त्यांचे व फिर्यादीचे या जागेवरून वाद आहेत.व त्या बाबत कोपरगाव न्यायालयात खटला दाखल आहे.असे असताना आरोपी अशोक गुंजाळ व कलाबाई बापू शिंदे हे आज सकाळी फिर्यादीच्या घरासमोर आले व त्यांनी फिर्यादी व फिर्यादीच्या आईला,” तुम्ही घराच्या बाहेर या,हे घर आमचे आहे.तेंव्हा फिर्यादी शंकर गुंजाळ व त्यांची आई हे आरोपी यांना समजावून सांगू लागले असता सुनील अशोक गुंजाळ,अनिल अशोक गुंजाळ,गणेश अशोक गुंजाळ,गणेश अशोक गुंजाळ,ताराबाई अशोक गुंजाळ,आशाबाई सुनील गुंजाळ सर्व रा.टाकळी नाका यांनी फिर्यादी शंकर गुंजाळ यांना शिवीगाळ करत हातातील काठ्यानीं फिर्यादीच्या डोक्यात मारहाण करून जखमी केले आहे.व अनिल गुंजाळ याने फिर्यादीचा पुतण्या शिवराज गुंजाळ तर गणेश अशोक गुंजाळ याने फिर्यादीचा मुलगा हर्षल शंकर गुंजाळ याचे डोक्यावर काठीने मारहाण करून त्याला दुखापत केली आहे.तर ताराबाई गुंजाळ,आशाबाई गुंजाळ कलाबाई बापू शिंदे यांनी फिर्यादीची आई बेबी गुंजाळ तसेच फिर्यादीची पत्नी ज्योती व बहीण जयश्री यांना लाथा बुक्यांनी मारहाण करून सर्वांनी तुम्ही आमच्या घरातून बाहेर निघून जा असे म्हणून घाण-घाण शिवीगाळ केली आहे.व तुम्ही जर आमच्या घराबाहेर निघाले नाही तर जीवे ठार मारू “अशी धमकी दिली आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सात आरोपी विरुद्ध गु.र.नं.२४०/२०२० भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.
Leave a Reply