संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच मान्यवरांच्या उपस्थितीत निवड झाली असून लायन्स क्लबच्या सचिव पदी अड्.मनोज कडू यांची निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कोपरगाव लायन्स क्लब हे कोपारगाव तालुक्यात सामाजिक कामासाठी ओळखले जाते.त्यांच्या जुन्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच मुदत संपली होती.त्यामुळे नूतन संचालक निवडीसाठी संचालक मंडळाची सभा आयोजित केली होती. सभेत सन-२०२०-२१ या सालासाठीच्या कार्यकारणीची निवड करण्यात आली .अॅड. कडू हे गेल्या दहा वर्षापासून कोपरगावच्या सामाजिक कार्यात सक्रिय आहे.यापूर्वी देखील त्यांनी विविध संस्था संघटनांच्या पदांवर काम केलेले आहे.सामाजिक कार्याचा अनुभवावरून त्यांची ही सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Leave a Reply