संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराचे उपनगर असलेले खडकी उपनगरात आज सकाळी नऊ वाजेच्या पूर्वी रात्री कधीतरी पांडुरंग जगन्नाथ वैराळ (वय-५७) यांनी अज्ञात कारणाने आपल्या राहात्या घरी छताला लावलेल्या फॅनला दोरी बांधून आत्महत्या केली असल्याची माहिती त्यांचा मुलगा नारायण पांडुरंग वैराळ (वय-३१) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यास दिली आहे.कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे.
मयत इसम पांडुरंग वैराळ यांची पत्नी कायम आजारी असल्याने व त्यावर उपचार होत नसल्याने ते नाराज असल्याची माहिती हाती आली आहे.त्या बाबीतून ते नैराश्येत गेले होते व त्यात त्यांना दारूचे व्यसन लागले होते व त्यातून त्यांनी रात्री (नेमकी वेळ माहिती नाही) छताच्या पंख्याला दोरी बांधून कोणी घरात जागे नाही अशी संधी साधत आपली जीवन यात्रा संपवली आहे.
या बाबत सदरचे सविस्तर वृत्त असे की,मयत इसम पांडुरंग वैराळ यांची पत्नी कायम आजारी असल्याने व त्यावर उपचार होत नसल्याने ते नाराज असल्याची माहिती हाती आली आहे.त्या बाबीतून ते नैराश्येत गेले होते व त्यात त्यांना दारूचे व्यसन लागले होते व त्यातून त्यांनी रात्री (नेमकी वेळ माहिती नाही) छताच्या पंख्याला दोरी बांधून कोणी घरात जागे नाही अशी संधी साधत आपली जीवन यात्रा संपवली आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात त्यांचा मुलगा नारायण वैराळ यांनी याबाबत खबर दिली असून कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी अकस्मात मृत्यू नोंद वहि क्रं.२५/२०२० सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.
Leave a Reply