संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात व तालुक्यात कोरोना साथीचे तीन रुग्ण आढळून हि अद्याप अनेक नागरिक आपल्या तोंडाला मुखपट्या न बांधत नसल्याची गंभीर बाब उघड झाल्याने आज कोपरगाव शहर पोलिसानी आज धडक कारवाई करत ११७ बेशिस्त नागरिकांवर कारवाई करून २८ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.तर कोपरगाव नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या कारवाईत ६० व्यक्तीवर कारवाई करत १२ हजार रुपयांची वसुली केली असून या दोन्ही यंत्रणांनी जवळपास ४० हजार ५०० रुपयांची वसुली केली आहे. त्यामुळे या बेशिस्त नागरिकांवर चाप बसण्यास मदत होणार आहे.
कोपरगावात १० एप्रिल नंतर दुसरा रुग्ण आढळला नव्हता.मात्र मध्यन्तरी एका महिला डॉक्टरचा अपवाद वगळता तालुका निरंक राहिला असताना करंजी व कोपरगावात संजयनगर येथील दोन रुग्ण आढळून आले होते.त्या नंतर सुरेगावात एक रुग्ण आढळून तालुक्यात पुन्हा कहर उडाला आहे.त्यामुळे तालुका प्रशासन आता आपली कारवाई कडक करणार असल्याचे नुकत्याच आ.आशुतोष काळे यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांच्या एका बैठकीत ठरले होते.त्याची प्रचिती आज आली आहे.
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ६ हजार ०६२ ने वाढून ती ५ लाख ७३ हजार ५९८ इतकी झाली असून १७ हजार ००८ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ०१ लाख ६९ हजार ८८३ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ०७ हजार ६१० जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ४२३ वर जाऊन पोहचली आहे तर १४ जणांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.दिल्ली,मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव,संगमनेर हि कोरोनाची केंद्रे ठरली आहेत.कोपरगाव तालुक्यातही दोन बळी गेले आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी सहाव्यांदा वाढवून ३० जुलै पर्यंत केली आहे.
कोपरगावात १० एप्रिल नंतर दुसरा रुग्ण आढळला नव्हता.मात्र मध्यन्तरी एका महिला डॉक्टरचा अपवाद वगळता तालुका निरंक राहिला असताना करंजी व कोपरगावात संजयनगर येथील दोन रुग्ण आढळून आले होते.त्या नंतर सुरेगावात एक रुग्ण आढळून तालुक्यात पुन्हा कहर उडाला आहे.त्यामुळे तालुका प्रशासन आता आपली कारवाई कडक करणार असल्याचे नुकत्याच आ.आशुतोष काळे यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांच्या एका बैठकीत ठरले होते.त्याची प्रचिती आज आली असून आज कोपरगाव शहर पोलिसानी आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या सह अन्य एक अधिकारी व सात पोलीस कर्मचारी यांच्या सहाय्याने हि कारवाई केली आहे.तर कोपरगाव नगरपरिषद आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यानी केलेल्या अन्य एका कारवाईत सुमारे साठ नागरिकांवर कारवाई करत अंदाजे १२ हजार रुपये दंड वसूल केला आहे.त्यामुळें जवळपास चाळीस हजार रुपये दंड या दोन्ही यंत्रणांनी वसूल केला आहे.त्यामुळे बेशिस्त नागरकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कोपरगाव नगरपरिषद व पोलीस विभागाने नागरिकांना मुखपट्यां बांधण्याचे आवाहन केले आहे.
Leave a Reply