संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील लायन्स क्लबची पदाधिकारी निवडीची बैठक नुकतीच संपन्न झाली असून त्यात अध्यक्षपदी व्यापारी महासंघाचे नूतन कार्याध्यक्ष सुधीर डागा यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे.तर लायनेस क्लबच्या अध्यक्षपदी किरण डागा यांची निवड जाहीर करण्यात अली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.
लायन्स नूतन अध्यक्ष सुधीर डागा
कोपरगाव लायन्स क्लब कार्यकारणी २०२०-२१ ची जाहीर करण्यासाठी नुकतीच क्लबच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली आहे.नुकत्याच झालेल्या लायन्स क्लबच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये लायन्स,लायनेस,लिवो क्लबची कार्यकारणी तुलसीदास खुबानी यांनी जाहीर केली आहे.
लायनेस अध्यक्षा किरण डागा
यात लायन्स क्लबचे अध्यक्षपदी सुधीर डागा,सचिवपदी ॲड.मनोज कडू,खजिनदारपदी राजेंद्र शिरोडे, लायनेस क्लब अध्यक्षपदी किरण सुधीर डागा,सचिव भावना गवांदे, खजिनदार आरती शिंदे, लिवो क्लब अध्यक्ष रोहित पटेल,सचिव पारस काले,खजिनदार संकेत पटेल, तसेच कॅबिनेट पदी तुळसिदास खुबानी,संदीप कोयटे, व झोन चेअरमनपदी डॉक्टर अभिजीत आचारी यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी सत्यम मुंदडा यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
लिओ अध्यक्ष रोहित पटेल
लायन्स क्लबचे नूतन अध्यक्ष सुधीरजी डागा हे कोपरगाव व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष असून समाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे.सर्व पदाधिकाऱ्यांचे कोपरगावात समाजसेवेत मोठे योगदान आहे.कोपरगाव तालुक्यात लायन्सचे समाजसेवेत नाव आहे.समाजसेवेची ही परंपरा अशीच यापुढेही अविरत चालूच ठेवण्याचा मनोदय सर्व नूतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला नूतन पदाधिकाऱ्यांचा आभासी (ऑनलाइन) शपथविधी लवकरच होणार असल्याची माहितीही मुंदडा यांनी शेवटी दिली आहे.
Leave a Reply