संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख ग्रामपंचायत हद्दीतील महाविद्यालयीन तरुणी (वय-२० वर्ष) हि दि.२५ जूनच्या रात्री आम्ही घरात झोपलो असताना व सकाळी उठलो असता ती घरात दिसली नाही.आसपास व नातेवाईकांकडे तपास केला असता ती मिळून आली नाही.ती बेपत्ता झाली असल्याची तक्रार मुलीचे पिता (वय -५०) यांनी रा.माहेगाव देशमुख यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.या घटनेने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
गायब तरुणी हि सुरेगाव येथील सुशीलामाई विद्यालयात वाणिज्य पदवी शाखेच्या पहिल्या वर्गात शिक्षण घेत होती.घरात आई,वडील,तीन बहिणी,एक भाऊ असा परिवार आहे.ती अंगाने सडपातळ असून उंची साधारण साडेपाच फूट आहे.अंगात मोरपंखी रंगाचा टॉप,गुलाबी रंगाची फुल पॅन्ट असून ती रंगाने सावळी आहे.कोणाला आढळून आल्यास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात खबर करावी असे आवाहन कोपरगाव तालुका पोलीसांनी केले आहे.या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.
Leave a Reply