संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात आता मागील आठवड्यात दि.२० जून रोजी दोन रुग्ण आढळल्यानंतर आता रुग्ण नाही असा दिलासा मिळाला असताना आता सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत मूळचे रहिवासी असलेले मात्र नाशिक येथे आजार पणामुळे तपासणीसाठी गेलेले तेथून त्यांची रवानगी शिर्डी येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयांत केलेल्या पंचेचाळीस वर्षीय रुग्णांचा श्राव तेथीलआरोग्य विभागाने नगर येथील शासकीय रुग्णालयात पाठवला असता तो व्यक्ती बाधित असल्याने निष्पन्न झाल्याची खात्रीलायक माहिती तालुका आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी आमच्या प्रतिनिधीस दिल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कोपरगावात १० एप्रिल नंतर दुसरा रुग्ण आढळला नव्हता.मात्र मध्यन्तरी एका महिला डॉक्टर,करंजी येथील मूळ निवासी असलेला मात्र नाशिक जिल्ह्यातील चांदवड या ठिकाणी आरोग्य विभागात शासकीय सेवेत असलेल्या एक रुग्ण व त्यानंतर कोपरगाव शहरातील संजयनगर येथील आयेशा कॉलनीतील एक महिला बाधित आढळली होती.त्या नंतर आठवडा भरात एकही रुग्ण आढळला नसताना आता सुरेगाव येथे हा नवीन रुग्णांची भर पडल्याने शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सदर रुग्णाच्या संपर्कात सात व्यक्ती आल्या असून त्यातील तीन जणांना कोपरगाव येथील श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहात संस्थात्मक विलगीकरण कक्षात रवाना केले आहे.तर अन्य तीन जण नगर येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षात रवानगी केली आहे.यातील संशयित एक जण राहाता तालुक्यातील असल्याने त्याला शिर्डी येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात भरती केले आहे.या सर्वांचे श्राव तपासणीसाठी नगर येथे पाठविण्याची तयारी करण्यात आली आहे-डॉ.संतोष विधाते.
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ०१ हजार २४६ ने वाढून ती ५ लाख १० हजार ६९२ इतकी झाली असून १५ हजार ७१२ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ०१ लाख ५२ हजार ७६५ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ०७ हजार १०७ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ३०४ वर जाऊन पोहचली आहे तर १२ जणांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.दिल्ली,मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव,संगमनेर हि कोरोनाची केंद्रे ठरली आहेत.कोपरगाव तालुक्यातही दोन बळी गेले आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी पाचव्यांदा वाढवून ३० जून पर्यंत केली आहे.कोपरगावात १० एप्रिल नंतर दुसरा रुग्ण आढळला नव्हता.मात्र मध्यन्तरी एका महिला डॉक्टर,करंजी येथील मूळ निवासी असलेला मात्र नाशिक जिल्ह्यातील चांदवड या ठिकाणी आरोग्य विभागात शासकीय सेवेत असलेल्या एक रुग्ण व त्यानंतर कोपरगाव शहरातील संजयनगर येथील आयेशा कॉलनीतील एक महिला बाधित आढळली होती.त्या नंतर आठवडा भरात एकही रुग्ण आढळला नसताना आता सुरेगाव येथे हा नवीन रुग्णांची भर पडल्याने शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे.त्यामुळे आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे.तहसीलदार योगेश चंद्रे,पोलीस निरीक्षक अनिल कटके व तालुका वैद्यकीय अधिकऱ्यानी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यास प्रारंभ केला आहे.
Leave a Reply