संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील निवारा हौसिंग सोसायटीत असलेल्या रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा ठराव कोपरगाव नगरपरिषदेने देण्याचा ठराव २८ फेब्रुवारीच्या सभेत ठराव क्रमांक ६ नुसार घेतला असून त्याला कोपरगावातील सकल मराठा समाज संघटनेने घेतला आहे.व महाराजांची प्रतिमा लहान करण्याचा हा डाव असल्याचा आरोप केला आहे.व हा ठराव रद्द न केल्यास आपण तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा बाळासाहेब आढाव,भरत मोरे,अशोक आव्हाटे यांनी दिला आहे.त्यामुळे या रस्त्यावरून वादंग होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.
या बाबत नगरसेवक जनार्दन कदम यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देणे गैर नाही.हा रस्ता मोठा असून या बाबत आपण जेष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करून तक्रार करणाऱ्या नागरिकांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे-नगरसेवक जनार्दन कदम
कोपरगाव शहरातील निवारा परिसरातील महापुरे शॉपी ते होन बंगला या रस्त्याला “छत्रपती शिवाजी महाराज” यांचे नाव देण्याचा ठराव निवारा परिसरातील नगरसेवक जनार्दन कदम व दीपा गिरमे या दोन नगरसेवकानी पुढाकार घेऊन घेतला होता.व तसा ठराव कोपरगाव नगरपरिषदेच्या २८ फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक १६ अन्वये ठराव घेतला होता व तो ठराव भाजपच्या नगरसेवकांनी बहूमताने संमत करण्यात आला होता.मात्र या ठरावाला सकल मराठा समाजाच्या वतीने विरोध करण्यात आला आहे.व त्या आशयाचे निवेदन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना दिले आहे.त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव या पूर्वी शहरातील मुख्य रस्त्याला देण्यात आले आहे.हि बाब प्रकर्षांने पुढे आणली आहे.व गल्ली बोळातील रस्त्यांना नाव देऊन महाराजांचे नाव छोटे होण्याचा धोका आहे. असे बजावले आहे.व कोपरगाव नगरपरिषदेने हा ठराव रद्द केला नाही तर मराठा समाज संघटना या ठरावाला रद्द करण्यास तीव्र विरोध करील असा इशारा शेवटी दिला आहे.
निवेदनावर बाळासाहेब आढाव,(कोल्हे गट)भरत मोरे,अशोक आव्हाटे,राजेंद्र वाकचौरे,दिनेश पवार,अनिरुद्ध काळे,वैभव आढाव,(कोल्हे गट) चंदशेखर म्हस्के आदींच्या सह्या आहेत.या घटनेत विशेष म्हणजे भाजपचे गटाचे प्रमुख नगरसेवकांसह दोघाजणांचा समावेश दिसत असल्याने या घटनेने कोपरगाव नगरपरिषदेत वेगळे राजकारण शिजत तर नाही ना ? हि शंका बळावली आहे.कारण नगरसेवक जनार्दन कदम हे राज्य पतसंस्था फेडरनेशन चे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांचे कट्टर समर्थक मानले जातात.व त्यांचा समावेशही कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीनंतर भाजपात (कोल्हे गटात) झालेला आहे.मात्र कोपरगाव विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे बदलली असल्याचा हा पुरावा मानला जात आहे.दरम्यान या प्रभागात पूर्वी नगरसेवक होऊन गेलेले व नंतर अकस्मात निधन झालेल्या नगरसेवकांचे नाव देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती हाती आली आहे.
Leave a Reply