संपादक-नानासाहेब जवरेकोपरगाव-(प्रतिनिधी)
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या बाबत भाजपचे आ.गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आ.आशुतोष काळे यांनी कार्यकर्त्यांसमवेत निषेध व्यक्त करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्र्यांना तहसीलदार योगेश चंद्रे यांच्यामार्फत आज सकाळी दिले आहे.
दरम्यान आ. गोपीचंद पडळकर यांच्या राष्ट्रवादीचे संस्थापक व नेते शरद पवार यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधानाचा निषेध व्यक्त करताना राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी निषेध व्यक्त केला असून पडळकर यांचे कार्य केवळ काही चित्रपट निर्मिती करण्यापूरते असून त्यांना आमचे नेते शरद पवार यांच्यावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही तेवढी त्यांची उंची नाही भाजपचे काही लोकप्रतिनिधी बेताल वक्तव्य करण्यात प्रसिद्ध असून आ. पडळकर हे अनेकांपैकी एक उदाहरण आहे.त्यांची टीका पातळी सोडून असल्याने दखलपात्र नाही असेही वर्पे यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणारे भाजपचे आ.गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला आज आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले,युवक अध्यक्ष नवाज कुरेशी, महिला अध्यक्षा प्रतिभा शिलेदार, युवती अध्यक्षा माधवी वाकचौरे, गटनेते विरेन बोरावके, सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणारे भाजपचे आ.गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला आज आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.या वेळी बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की,महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देऊन देशात राज्याला देशाचे नेते शरद पवार यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली आहे.राज्याचे मुख्यमंत्री,केंद्रीय कृषिमंत्री,संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी केलेले काम अजोड आहे. त्यांच्या बाबत असे वक्तव्य करणे हे अत्यंत चुकीचे असून निंदनीय आहे.शरद पवार यांचे सर्व पक्षीय नेत्यांसोबत अतिशय जिव्हाळ्याचे संबंध असून सर्व पक्षीय नेत्यांना पवार यांच्याबद्दल नितांत आदर आहे.त्यामुळे अशी खालच्या थरावरील टीका करणाऱ्या अल्पबुद्धी पडळकरांना जनता कधीच माफ करणार नाही. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले,युवक अध्यक्ष नवाज कुरेशी,महिला अध्यक्षा प्रतिभा शिलेदार,युवती अध्यक्षा माधवी वाकचौरे,गटनेते विरेन बोरावके सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply