संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव ग्रामपंचायत हद्दीत माध्यमिक विद्यालयानजीक रहिवासी असलेली विवाहित महिला कोमल शरद साळवे (वय-२०) हीचा आपल्या घरातील कपडे वाळू घालत असताना अचानक विजेच्या तीव्र धक्का लागून जागीच निधन झाले आहे.या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास हि मयत महिला आपल्या घरातील धुणे धुवुन ते वाळू घालण्यासाठी आपल्या पडवीत गेली असता ते दोन खांबाच्या मधील पाईपवर धुणे वाळू घालत असताना तिला अचानक विजेच्या तीव्र धक्का बसला त्यात ती जागीच गतप्राण झाली आहे.
ब्राम्हणगाव ग्रामपंचायत हद्दीत माध्यमिक विद्यालयानजीक शरद साळवे यांचे एक कुटुंब राहत असून घरात मयत महिलेचा पती,सासू,सासरे,देर,भाया,जाव असे मोठे कुटुंब राहत आहे.आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास हि मयत महिला आपल्या घरातील धुणे धुवुन ते वाळू घालण्यासाठी आपल्या पडवीत गेली असता ते दोन खांबाच्या मधील पाईपवर धुणे वाळू घालत असताना तिला अचानक विजेच्या तीव्र धक्का बसला त्यात ती जागीच गतप्राण झाली आहे.जवळच्या नातेवाईकांनी तिला तातडीने एका खाजगी रुग्णालयात व नंतर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयांत उपचारासाठी दाखल केले असता तपासणी करणाऱ्या वैद्यकीय अधिकऱ्यानी तिला मृत घोषित केले आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी ग्रामीण रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाप्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.श्री आंधळे हे करीत आहेत.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.या मृत महिलेला एक चार महिन्याची मुलगी असल्याची माहिती हाती आली आहे.
Leave a Reply