संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या महाबीज व ग्रीनगोल्ड कंपनीच्या बियाणांबाबत शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारींची पाहणी करण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी चांदेकसारे व कोकमठाण व परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पेरणी करून उगवण न झालेल्या पिकांची बियाणे शास्त्रज्ञांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली असून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
कोपरगाव तालुक्यात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने खरिपाच्या पेराण्यांना धोका झाला असून तालुक्याच्या पूर्व भागात अनेक ग्रामस्थांच्या शेतात व घरात पाणी गेल्याने अनेकांचे नुकसान झाल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे.व त्यामुळे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले असे त्यांनी म्हटले आहे.या पार्श्वभूमीवर आ. काळे यांनी या दौऱ्याचे आयोजन चांदेकसारे व कोकमठाण शिवारात केले होते.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांनी खरेदी केलेली महाबीज,ग्रीनगोल्ड आदी कंपनीचे बाजरी,मका,सोयाबीन आदी बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आ.आशुतोष काळे यांच्याकडे आल्यानंतर दोन दिवसांपूर्वी तातडीने बैठक घेवून शेतकरी,कृषी विभागाचे अधिकारी व महाबीज व ग्रीनगोल्ड कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेवून शेतकऱ्याच्या बांधावर जावून पाहणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र बुधवार दिनांक (२४) रोजी आ. काळे स्वत:च बियाणे शास्त्रज्ञांना सोबत घेवून उगवण न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
या वेळी आ. काळे यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी बाबत महाबीज व ग्रीनगोल्ड कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत तातडीने चर्चा करून शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न करावे.शेतकरी अडचणींचा सामना करीत असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याचे संकट ओढवले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व लवकरात लवकर उच्च प्रतीचे बियाणे उपलब्ध करून द्यावे अशा सूचना दिल्या. यावेळी आमदार आशुतोष काळे यांच्या समवेत महात्मा फुले कृषी विद्यापीठातील बियाणे शास्त्रज्ञ डॉ. रामसिंग, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव,पंचायत समिती कृषी अधिकारी पंडित वाघिरे, कृषी पर्यवेक्षक संजय धनकुटे, कृषी अधिकारी पांडुरंग जाधव, महाबीज फिल्ड ऑफिसर कविता देवढे,कृषी दुकानदार प्रतिनिधी दीपक गव्हाळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक आनंदराव चव्हाण, सुधाकर रोहोम, डॉ. गोरक्षनाथ रोकडे, जिनिंग प्रेसिंगचे संचालक सुदाम लोंढे,विजय रक्ताटे,महेश लोंढे,विजय थोरात आदी उपस्थित होते.
Leave a Reply