संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
प्रतिकूल परिस्थितीत मिळविलेल्या यशाची किंमत होऊच शकत नसल्याने आपण प्रतिकूल परिस्थितीचा विचार न करता आपल्याला जे निश्चित उद्दिष्ट साध्य करायचे असेल ते डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केल्यास यशाचे शिखर सहज गाठता येते असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
जवाहर नवोदय विद्यालय ही शत प्रतिशत केंद्र शासन अनुदानीत विद्यालये आहेत. ही योजना पी.व्ही. नरसिंहराव यांनी मांडली होती.ही विद्यालये मनुष्यबळ विकास मंत्रालयाव्दारे राबविली जातात.यात प्रवेशासाठी प्राथमिकता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिला जातो.येथे भारतातील काही विशेष,गुणी विद्यार्थांना शिकण्याची संधी मिळते.
कोपरगाव तालुक्यातील नवोदय परीक्षेत यश मिळविणाऱ्या गुणवंतांचा आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते नुकताच सन्मान करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी सभापती पोर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,जी.प.सदस्य सुधाकर दंडवते,कारभारी आगवण,पंचायत समिती सदस्य श्रावण आसने, मधुकर टेके,रोहिदास होन,राहुल जगधने,गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,प्रसाद साबळे,सांडूभाई पठाण,आर.के.ढेपले,किशोर निळे,विद्या भोईर,आत्मा मलिक विद्यालयाचे मुख्याध्यापक निरंजन डांगे आदी मान्यवरांसह पालक,शिक्षक बहू संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी सभापती पोर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,जी.प.सदस्य सुधाकर दंडवते,कारभारी आगवण,पंचायत समिती सदस्य श्रावण आसने, मधुकर टेके,रोहिदास होन,राहुल जगधने,गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,प्रसाद साबळे,सांडूभाई पठाण,आर.के.ढेपले,किशोर निळे,विद्या भोईर,आत्मा मलिक विद्यालयाचे मुख्याध्यापक निरंजन डांगे आदी मान्यवरांसह पालक,शिक्षक बहू संख्येने उपस्थित होते.
या वेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या अद्वितीय यश हे शब्दाच्या पलीकडले आहे अशा शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.विद्यार्थ्यांच्या यशात त्यांच्या पालकांचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या त्यांच्या गुरुजनांचा देखील मोठा वाटा आहे. खाजगी शाळांच्या बरोबरीत जिल्हा परिषदच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील नवोदय परीक्षेत मिळविलेले यश जिल्हा परिषदेच्या शाळा कोणत्याच बाबतीत मागे नसल्याचे सिद्ध होत आहे. नवोदय परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना राज्यातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांसोबत शिक्षण घेण्याची संधी मिळणार असून मिळालेल्या संधीचे विद्यार्थ्यांनी सोनं करावं असे आवाहन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नुकतीच तहसीलदारपदी निवड झालेल्या कोपरगाव तालुक्यातील बहादराबाद येथील सागर जोंधळे यांचा आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी गोकुळ पाचोरे,शशिकांत पाचोरे,राजेंद्र पाचोरे,पोपट जोंधळे आदी मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply