संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोना कालखंडात अंगणवाडी सेविकांनी राज्यात कामबंद आंदोलन सुरु केले असल्याने कोरोना बाधित रुग्णांच्या शोधासह सर्व पाहणी अहवाल करण्याचे जोखमीच्या सर्व कामाचा भार आशा सेविकांवर आला असल्याने आशा सेविकांचे मानधन एक हजाराहून १० हजारा पर्यंत वाढवावे अशी मागणी कोपरगाव नगरपरिषदेच्या आरोग्य केंद्राच्या आशा सेविकांनी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्याकडॆ एका निवेदनाद्वारे केली आहे.
आशा सेविका आरोग्यविषयक बाबींसंबंधी मदत व मार्गदर्शन करण्यास आशा सदैव तत्पर असतात. मात्र त्यांना शासन मात्र अत्यंत कमी मानधन देत असल्याने त्यांच्यात मोठी नाराजी आहे.वर्तमानात मात्र या आशांवर अंगणवाडी सेविकांचे काम अंगावर येऊन पडले आहे.मात्र त्यांना अत्यंत तुटपुंजी रक्कम देण्यात येते.शिवाय कोरोना साथीच्या कालखंडात या आशा सेविका कोरोना बाधितांना बाधित अथवा प्रतिबंधीत क्षेत्रात शोधण्याचे जोखमीचे काम करीत आहे.त्यामुळे हि रक्कम दहा हजार रुपये करावी अशी मागणी केली आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत ग्रामस्तरावर आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी आशाचा उपयोग होतो.ग्रामीण जनता व आरोग्य केंद्र यांच्यामध्ये आशा या मध्यस्थीचे काम करतात. गैर-आदिवासी भागात १ हजार ५०० लोकसंख्येमागे एक आशा तर आदिवासी भागामध्ये १ हजार लोकसंख्येमागे एक आशा नियुक्त करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छता,लसीकरण यांचे महत्व पटवून देण्यासाठी त्याचप्रमाणे ताप,हगवण,लहान-मोठया जखमा यावरील प्राथमिक स्वरुपाचे उपचार करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येते.तसेच डॉट्स,फोलिक ऍसिड आणि क्लोरोक्विन सारख्या इतरही गोळयांचे वाटप करण्याची कामे आशा मार्फत केली जातात.त्याचप्रमाणे आरोग्यविषयक गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची माहिती संबंधित यंत्रणेला देण्याची जबाबदारीही आशावर असते. ग्रामीण भागातील आशा या स्वयंसेवक पध्दतीने जरी काम करीत असल्या तरी त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना प्रोत्साहनपर वेतन ,भत्ते देण्याची अल्पशी तरतूद करण्यात आली आहे.याद्वारे आशांना एक प्रकारचा रोजगारच उपलब्ध करुन दिला जातो.ग्रामीण महिलांना बाळंतपण सुखरुप प्रसुती, स्तनपान, लसीकरण, गर्भप्रतिबंधक उपाययोजना, जननेद्रीयांशी संबंधित जंतुसंसर्ग, लैगिंक संबंधातुन होणारे जंतुसंसर्ग, नवजात अर्भकाची काळजी आदी आरोग्यविषयक बाबींसंबंधी मदत व मार्गदर्शन करण्यास आशा सदैव तत्पर असतात. मात्र त्यांना शासन मात्र अत्यंत कमी मानधन देत असल्याने त्यांच्यात मोठी नाराजी आहे.वर्तमानात मात्र या आशांना अंगणवाडी सेविकांचे काम अंगावर येऊन पडले आहे.मात्र त्यांना अत्यंत तुटपुंजी रक्कम देण्यात येते.शिवाय कोरोना साथीच्या कालखंडात या आशा सेविका कोरोना बाधितांना बाधित अथवा प्रतिबंधीत क्षेत्रात शोधण्याचे जोखमीचे काम करीत आहे.त्यामुळे हि रक्कम दहा हजार रुपये करावी अशी मागणी त्यांनी एका निवेदनाद्वारे शेवटी केली आहे.
या निवेदनावर सपना दाभाडे,सुवर्णा शिर्के,सुवर्णा वायखिंडे,विजया दुशिंग,सविता कदम,विद्या सोनपसारे,वैशाली वाघ,रेखा मांडगे, कुसुम बागुल,छाया सुपेकर,योगिता गरुड,सुरेखा थोरात यांच्यासह अठरा आशा सेविकांच्या सह्या आहेत.या बाबत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी त्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तशी मागणी शासनाकडे करण्यात येईल असे आश्वासित केले आहे.
Leave a Reply