संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
एक जूनपासून शासनाने लॉकडाऊन जरी वाढवला असला तरी काही अटी शिथिल केल्यामुळे इतर जिल्ह्यातून व परराज्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्या देखील वाढली आहे. सुदैवाने कोपरगाव तालुक्यात शेजारच्या इतर तालुक्याच्या तुलनेत कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी असले तरी टाळेबंदी मुक्तीमुळे कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारून चालणार नाही. त्यासाठी नागरिकांनी काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.
प्रशासनाने अटी शिथिल केल्यामुळे कोरोनाचे संकट कमी झाल्याचा नागरिकांमध्ये गैरसमज आहे.त्यामुळे अनेक नागरिक विनाकारण गर्दी करीत आहे.आरोग्य विभाग व प्रशासनाला येणाऱ्या सर्व अडचणी सोडविल्यामुळे प्रशासन अतिशय चांगल्या प्रकारचे काम करीत असून शेजारच्या तालुक्यातील रुग्ण संख्या पाहता आपण खूप सुदैवी आहोत.टाळेबंदीच्या अटी शिथिल कशासाठी केल्या आहेत याची जाणीव ठेवावी.घराबाहेर पडतांना मुखपट्या व प्रतिबंधात्मक साधनांचा वापर करून सुरक्षित अंतर ठेवावे-आ. काळे
मागील आठवड्यात कोरोनामुक्त झालेल्या कोपरगाव तालुक्यात दोन दिवसांपूर्वी कोपरगाव शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात प्रत्येकी एक कोरोना रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर आ.काळे यांनी कोपरगाव तहसील कार्यालयात नुकतीच बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते.यावेळी ते म्हणाले की,तालुक्यात टाळेबंदी उठवली गेली आहे त्यामुळे प्रशासनाने अटी शिथिल केल्यामुळे कोरोनाचे संकट कमी झाल्याचा नागरिकांमध्ये गैरसमज आहे.त्यामुळे अनेक नागरिक विनाकारण गर्दी करीत आहे.आरोग्य विभाग व प्रशासनाला येणाऱ्या सर्व अडचणी सोडविल्यामुळे प्रशासन अतिशय चांगल्या प्रकारचे काम करीत असून शेजारच्या तालुक्यातील रुग्ण संख्या पाहता आपण खूप सुदैवी आहोत.टाळेबंदीच्या अटी शिथिल कशासाठी केल्या आहेत याची जाणीव ठेवावी.
या बैठकीसाठी तहसीलदार योगेश चंद्रे, सभापती पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे,नगराध्यक्ष विजय वहाडणे,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,नगरसेवक विरेन बोरावके,मंदार पहाडे,राजेंद्र वाकचौरे,अजीज शेख, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, डॉ.अजय गर्जे, राष्ट्रवादीचे सर्व जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्य,कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसुंदर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते,डॉ.सौ.वैशाली बडदे,पोलीस निरीक्षक राकेश मानगांवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की,तालुक्यात टाळेबंदी उठवली गेली आहे घराबाहेर पडतांना मुखपट्या व प्रतिबंधात्मक साधनांचा वापर करून सुरक्षित अंतर ठेवावे. तसेच या बैठकीत आरोग्य विभागाला काही अडचणी आहेत का ? याची चाचपणी केली. तालुक्यातील नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण झाली आहे का ? व कोरोना निवारणासाठी दिलेल्या साहित्याबाबत कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते व त्यांच्या सहकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. कोपरगाव तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयातील अनेक कर्मचारी हे शेजारच्या तालुक्यातील रहिवासी असून हे कर्मचारी कोरोना हॉटस्पॉट असलेल्या तालुक्यातून नियमितपणे ये-जा करत असल्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो त्यासाठी या कर्मचाऱ्यांनी नेमणुकीच्या ठिकाणीच राहावे असे आदेश आ.काळे यांनी दिले.
Leave a Reply