संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
दिव्यांगांच्या अनेक समस्या असून त्यांना आपल्या कार्यकाळात आपण न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन कोपरगाव विधानसभेचे आ. आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
नियतीने दिव्यांगांवर जरी अन्याय केला असला तरी समाजाने दिव्यांग व्यक्तीबरोबर नेहमीच आपुलकीने वागले पाहिजे. शारीरिक व्यंग असून देखील त्या व्यक्ती विनयशीलता दाखवत वस्तुस्थितीचा स्वीकार करून आपल्यातील स्वक्षमता सिद्ध करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. दिव्यांगांच्या दैनंदिन गरजा प्रत्येक दिव्यांगांच्या कुटुंबाकडून पूर्ण होतातच असे नाही अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या दिव्यांगांच्या पंखांना बळ देण्यासाठी आपण कटिबद्ध आहे-आ. काळे
कोपरगाव तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत मंजूर करण्यात आलेल्या १ लाख ८० हजार रुपयांच्या अर्थसहाय्य आ.आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते देण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक आनंदराव चव्हाण,सचिन रोहमारे,पंचायत समितीच्या माजी सभापती अनुसया होन, रोहिदास होन,डॉ.गोरक्षनाथ रोकडे,दगू होन,गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,विस्तार अधिकारी सुनील माळी व दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते.
या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, दिव्यांग व्यक्ती नियतीने दिव्यांगांवर जरी अन्याय केला असला तरी समाजाने दिव्यांग व्यक्तीबरोबर नेहमीच आपुलकीने वागले पाहिजे. शारीरिक व्यंग असून देखील त्या व्यक्ती विनयशीलता दाखवत वस्तुस्थितीचा स्वीकार करून आपल्यातील स्वक्षमता सिद्ध करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. दिव्यांगांच्या दैनंदिन गरजा प्रत्येक दिव्यांगांच्या कुटुंबाकडून पूर्ण होतातच असे नाही अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या दिव्यांगांच्या पंखांना बळ देण्यासाठी आपण कटिबद्ध आहे.दिव्यांग व्यक्ती खडतर परिस्थितीत जीवनाची लढाही लढत आहे.त्यांना देखील समाजात मानाने वागण्याचा अधिकार आहे.समाजाने त्यांच्या बाबत सकारात्मक विचार करून त्यांना अपेक्षित प्रोत्साहन दिल्यास सर्वच दिव्यांग समाजात सन्मानाने जगू शकतात. दिव्यांगांसाठी महाविकास आघाडी सरकार चांगले काम करीत असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आ.काळे यांनी शेवटी सांगितले. आ.काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्या सोनाली साबळे यांनी या योजनेसाठी प्रयत्न केले होते.
Leave a Reply