संपादक-नानासाहेब जवरे
धारणगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील परीसरात पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला करून गुरूवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान चव्हाण वस्ती वरील शरद चव्हाण व सुधाकर चव्हाण या दोघा भावांच्या दोन शेळ्या ठार केल्या आहेत.या घटनेने जेऊर कुंभारी परिसरात खळबळ उडाली आहे.
कोपरगाव तालुक्यात बिबट्याचे वास्तव्य नाही मात्र अलीकडील काळात वारंवार अशा बातम्या येत असल्याने शेतकरी वर्गात व पशुपालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या अगोदर चव्हाण वस्तीवरील जयराम चव्हाण यांनी बिबट्या प्रत्यक्ष बघीतला होता.त्या वेळी जयराम चव्हाण यांनी हि बाब वनविभागाच्या निदर्शनात आणली होती व पिंजरा लावण्याची मागणीही केली होती.मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्याने हि दुर्घटना घडली आहे.
कोपरगाव तालुक्यात बिबट्याचे वास्तव्य नाही मात्र अलीकडील काळात वारंवार अशा बातम्या येत असल्याने शेतकरी वर्गात व पशुपालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या अगोदर चव्हाण वस्तीवरील जयराम चव्हाण यांनी बिबट्या प्रत्यक्ष बघीतला होता.त्या वेळी जयराम चव्हाण यांनी हि बाब वनविभागाच्या निदर्शनात आणली होती व पिंजरा लावण्याची मागणीही केली होती.पण या गोष्टीकडे वनविभागाने सोयीस्कर दुर्लक्ष केल्यामुळे एक आठवड्याच्या आतच हि दुर्घटना घडली आहे. त्याच परीसरात चार किलोमीटर अंतरावर डाऊच गावातील अर्जुन होन यांच्या चार शेळ्या बिबट्या ठार केल्याची घटना घडली होती. या घटनेची पाहणी आमदार आशुतोष काळे,व डाऊच गावातील सरपंच संजय गुरसळ यांनी केली होती.त्या नंतर तिथे पिंजरा लावण्यात आला परंतु बिबट्याने डाव साधत दुसऱ्याच ठिकाणी.गुरूवार रोजी सुधाकर चव्हाण व शरद चव्हाण या दोघा भावांच्या शेळ्या बिबट्यांने ठार केल्या असुन चौदा हजार रूपयेचे नुकसान झाल्याची माहीती सुधाकर चव्हाण यांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी सांगळे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे. वनविभागाने या घटनेकडे गांभिर्याने लक्ष देऊन जेऊर कुंभारी परिसरात पिंजरा लावुन बिबटयाचा बंदोबस्त करावा अशी मागणी परीसरातील ग्रामस्थांनी केली आहे या घटनेने पुन्हा जेऊर कुंभारी परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.पंचनामा वेळी आनंद चव्हाण,कैलास चव्हाण,पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड आदी ग्रामस्थ उपस्थित होते
Leave a Reply