संपादक-नानासाहेब जवरे
श्रीरामपूर- (प्रतिनिधी)
श्रीरामपूर- (प्रतिनिधी)
श्रीरामपूर तालुक्यातील नाऊरचे सरपंच सोन्याबापू शिंदे यांच्या जाफराबाद शिवारातील गट. न.103 मधील राहत्या घराजवळील गोठ्यातून 2 गावरान काठेवाड शिंगाच्या, काळ्या रंगाच्या शेळ्यांची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे.
रविवार दि. 22 रोजी रात्रीच्या सुमारास गोठ्यामध्ये जनावरांना व शेळ्यांना चारा टाकून शिंदे कुटुंब झोपी गेले. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने सहा शेळ्या पैकी 2 शेळ्या चोरून नेल्याचे सकाळी त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी सोन्याबापू शिंदे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भां. द. वि. कलम 379 नुसार श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अशोकराव गायकवाड हे करत आहे.
Leave a Reply