सावळीविहिर बु.-(प्रतिनिधी )
राहाता तालुक्यातील सावळविहीर बु.ग्रामपंचायत हद्दीतील लुंबिनी बुध्द विहार येथे महात्मा फुले यांचा स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करुन अभिवादन केले.
यावेळी बहुजनांचे महामेरु विचारांचे सागर महात्मा जोतिबा जोतिबा फुले यांच्या जीवनावर व त्यांच्यावर झालेले अन्याय तसेच अस्पृश्य समाज व बहुजनांच्या हितासाठी केलेला त्याग शिक्षणाची ज्योत मशाल पेटविणारे फुले दाम्पंत्य या विषयावर चिंतन मंथन करुन चर्चा करण्यात येउन त्यांच्या कार्यास व विचाराच्या आठवणीला ऊजाळा देऊन स्मृतीदिन साजरा करण्यात आला. यावेळी सावळविहीर बु.येथील सामाजिक कार्यकर्ते कचरु वाघमारे गुरुजी, सुनिल गायकवाड,गौतम गोडगे, लक्ष्मण बनसोडे,विजय जगताप,अशोक जाधव,भाऊराव डोखे,नाना आव्हाड, सचिन वाघमारे आदीं प्रमुख मान्यवरांसह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
Leave a Reply