जनशक्ती न्यूजसेवा
श्रीरामपुर-(प्रतिनिधी)
अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीने सभासदांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत कर्जावरील व्याजदर ९ टक्कयावरुन ८.५ टक्के केला असून जामीनकी कर्जाची मर्यादाही ०२ लाख रुपयांनी वाढवली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले असून कर्ज व्याजदर कपातीच्या निर्णयाची १६ सप्टेंबर पासूनच अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. उपनिबंधकांची मंजुरी मिळल्यानंतर सभासदांना वाढीव कर्ज मर्यादेनुसार कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती संस्थेचे जेष्ठ संचालक सूर्यकांत डावखर यांनी दिली आहे.
कर्जावर कमीत कमी व्याजदर व ठेवींवर जास्तीत जास्त व्याज हा दंडक संस्थेने कायम पाळला आहे. संस्थेची वाटचाली स्वयंपूर्णतकडे असून कितीही अडचणी आल्या तरी पुरोगामी सहकार मंडळ सभासदहिताच्या विश्वसनीय कारभाराची परंपरा कायम राखणार आहे-कचरे
अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचेअध्यक्ष काकासाहेब घुले यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी संचालक मंडळाची बैठक संपन्न झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
सदर बैठकीस उपाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे,ज्येष्ठ संचालक प्रा.भाऊसाहेब कचरे,सचिव स्वप्निल इथापे,संचालक सूर्यकांत डावखर,धनंजय म्हस्के,सुरेश मिसाळ, चांगदेव खेमनर,अप्पासाहेब शिंदे,बाबासाहेब बोडखे,दिलीप काटे, अशोक ठुबे,संजय कोळसे,सत्यवान थोरे,अनिल गायकर, कैलास रहाणे,अण्णासाहेब ढगे,धोंडिबा राक्षे,महेंद्र हिंगे, वसंत खेडकर,आशा कराळे,मनिषा म्हस्के,संतोष टावरे, दिलावर फकिर आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”माध्यमिक शिक्षकांची कामधेनू असलेल्या माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या पारदर्शी कारभाराची परंपरा कायम जपण्यात आली आहे. सध्याच्या कोविड काळात एकूणच अर्थकारणावर मोठा परिणाम झाला आहे. अशाही परिस्थितीत संस्थेने सभासद हिताला प्राधान्य दिले आहे.कर्ज मर्यादा वाढवतानाच कर्जावरील व्याजदरातही कपात करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.कोविड १९ च्या साथीमुळे मयत सभासदांची संख्या दुर्दैवाने वाढत आहे.त्यामुळे संस्थेने मयत निधी तात्पुरत्या स्वरुपात दरमहा २५० रुपयांनी वाढवला आहे.त्यामुळे मयत सभासदांच्या कुटुंबियांना संस्थेकडून जास्तीत जास्त मदत मिळणार आहे.
ऑनलाइन सभा घेऊन लाभांश देणार-प्रा कचरे
कर्जावर कमीत कमी व्याजदर व ठेवींवर जास्तीत जास्त व्याज हा दंडक संस्थेने कायम पाळला आहे. संस्थेची वाटचाली स्वयंपूर्णतकडे असून कितीही अडचणी आल्या तरी पुरोगामी सहकार मंडळ सभासदहिताच्या विश्वसनीय कारभाराची परंपरा कायम राखणार आहे. त्यामुळेच संचालक मंडळाच्या बैठकीत कर्जावरील व्याजदरात कपात करण्यासह कर्ज मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जावर कमीत कमी व्याजदर असलेली माध्यमिक शिक्षक सोसायटी जिल्ह्यातील एकमेव संस्था आहे. लाभांश वाटपाचेही नियोजन सुरु असून राज्य सरकारने वार्षिक सभा घेण्याची मुदत आता ३१ डिसेंबर पर्यंत वाढवली आहे. त्याआधी आवश्यक परवानगी घेवून ऑनलाईन पध्दतीने वार्षिक सभा घेवून लवकरात लवकर लाभांश वाटप करण्याचा प्रयत्न असल्याचे सत्ताधारी पुरोगामी सहकार मंडळाचे नेते प्रा भाऊसाहेब कचरे यांनी सांगितले आहे
मागितले होते १५ दिले १२ लाख
आपण स्वतः व महेंद्र हिंगे,वसंतराव खेडकर व बाबासाहेब बोडखे आदी संचालकांनी जामीन कर्ज १५ लाख करावे,१५ टक्के लाभांश मिळावा,ऑडिट फी वरील ६५ लाख तरतूद कमी करावी,कोविडच्या पार्श्वभूमीवर तीन महिने व्याज आकारू नये,कायम ठेवींवरील व्याजदर वाढवावा,लाभांश व व्याज सभासदांच्या खात्यावर जमा करावे आदी महत्वाच्या मागण्या १४ जून रोजीच सत्ताधारी गटाकडे केल्या होत्या.आम्ही तर कर्जमर्यादा १५ लाख करण्याची मागणी केली होती मात्र प्रत्यक्षात १२ लाखच मिळाल्याचे विरोधी गटाचे नेते आप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले.