जनशक्ती न्यूजसेवा
बेलापूर -(प्रतिनिधी)
मागासवर्गीव व ओ.बी.सी.विद्यार्थ्यांना शासनाकडून विविध प्रकारच्या शिष्यवृत्त्या दिल्या जातात.या शिष्यवत्ती प्रस्तावासाठी विविध कागदपत्रे लागतात हे ओघाने आलेच मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासकीय कार्यालयात व बँकांमध्ये त्याची पुर्तता करण्यासाठी वर्तमान कालखंडात मोठ्या अडचणीन्चा सामना करावा लागत असल्याने पालक व विद्यार्थ्यांची दमछाक होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शिष्यवृत्तीसाठी लागणारी कागदपत्रे अर्जंट जमा करण्याची सक्ती पालकांना व विद्यार्थ्यांना सक्ती करु नये.विनाकारण पालकांसह विद्यार्थ्यांची धावपळ करु नये,शाळांनी त्यांच्याकडे सध्या उपलब्ध असणार्या कागदत्रांच्या आधारे प्रस्ताव तयार करावेत व १५ आक्टोबर पर्यंत सादर करावेत.तो पर्यंत कागदपत्रेही उपलब्ध होण्यास मदत होईल-संजीवन दिवे,गट शिक्षणाधिकारी
केंद्र व राज्य शासनाकडून विविध मागास प्रवर्गातील व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना तसेच अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते.त्यासाठी जातीचा दाखला,तहसीलदारांचा ऊत्पन्नाचा दाखला,आधार कार्ड,राष्ट्रीयकृत बँकेत खाते आदी महत्वाची कागदत्रे आवश्यक असतात.शाळांनी विद्यार्थ्यांना ही कागपत्रे जमा करण्याबाबत सुचना केल्या आहेत.त्यामुळे ही कागदपत्रे जमा करण्यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांची मोठी धावपळ सुरु आहे.तहसीलदारांचा ऊत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी तलाठ्याकडून ऊत्पन्नाचा दाखला घ्यावा लागतो.मात्र सध्या एका तलाठ्याकडे एकापेक्षा अनेक गावांची जबाबदारी आहे.त्यामुळे त्यांची भेट वेळेत होत नाही.तर दुसरीकडे अनेकांकडे जातीचे दाखले नाहीत त्यांना ते मिळण्यासाठी सर्व कागदपत्रांची पुर्तता करणे ते सेतु कार्यालयामार्फत तहसीलदारांकडे सादर करणे यासाठी विलंब होत आहे.तर दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकेत विद्यार्थ्यांचे स्वतःचे खाते आवश्यक असते.बँकाही सध्या गर्दीमुळे ते ऊघडायला टाळाटाळ करीत आहेत.तर सेवा केंद्रा मार्फत खाते ऊघडल्यास खाते क्रमांक लवकर मिळत नाही.अशा द्विधा मनस्थीती पालकांसह विद्यार्थ्यांची झाली आहे.त्यामुळे शिष्यवृत्ती मिळते की नाही अशीही भिती पालकांना वाटत आहे.
Leave a Reply