जनशक्ती न्यूजसेवा
सावळीविहीर (प्रतिनिधी )
सध्या कोरोनामुळे पितृ पक्षावरही मोठे सावट आल्याचे दिसून येत आहे.दरवर्षाप्रमाणे पितृपक्षात आपल्या पितरांना नैवेद्य दाखवून घरोघरी मोठ्या पंक्ती उठवण्याचे चित्र यावर्षी कोरोनामुळे मात्र दिसून येत नाही. पितरांचे जेवण व अन्नदान यावर्षी निमंत्रण न देता उपवासकरू व जवळचे नातलग किंवा मित्र असे चार-पाच जण मिळूनच श्राद्ध जेवण सध्या घातले जात आहे व शहरा पासून तर ग्रामीण भागात असे सार्वत्रिक चित्र यावर्षी दिसून येत आहे.
पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष होय.हा भाद्रपद महिन्यातला कृष्ण पक्ष असतो.यास ‘महालय’ असेही नाव आहे.आपल्या नातेवाइकाचा मृत्यू ज्या तिथीस झाला असेल,त्या नातेवाइकाचे श्राद्ध,पितृपक्षातील त्याच तिथीस करण्याची हिंदू परंपरा आहे.या निमित्ताने आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते. या श्राद्धविधीत आपल्या गोत्रातील ज्ञात-अज्ञात अशा सर्वांचे पिंडरूपाने पूजन केले जाते.
पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष होय.हा भाद्रपद महिन्यातला कृष्ण पक्ष असतो.यास ‘महालय’ असेही नाव आहे.आपल्या नातेवाइकाचा मृत्यू ज्या तिथीस झाला असेल,त्या नातेवाइकाचे श्राद्ध,पितृपक्षातील त्याच तिथीस करण्याची हिंदू परंपरा आहे.या निमित्ताने आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते. या श्राद्धविधीत आपल्या गोत्रातील ज्ञात-अज्ञात अशा सर्वांचे पिंडरूपाने पूजन केले जाते.या पक्षात यमलोकातून पितर (मृत पूर्वज) आपल्या कुटुंबीयांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात अशी समजूत असल्याने या पंधरवाड्याला महत्व आहे.वर्तमानात हा पितृपक्ष २ सप्टेंबर पासून सुरू झाला आहे.तो १७ सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या पर्यंत चालणार आहे.प्रतिपदा (प्रथम) श्राद्ध हे पौर्णिमेनंतर सुरू झाले व त्या दिवसापासून घरोघरी प्रत्येकजण आपल्या पूर्वजांना किंवा पितरांना नैवेद्य करून जेऊ घालत आहे.कावळ्यांना पाव-पाव करुन बोलावुन त्यांना मान देत आपले पूर्वज समजून प्रथम त्यांना नैवेद्य दिला जातो.सध्या पितृपक्ष कोरोणामुळे साध्या पद्धतीने मात्र घरोघरी साजरा होताना दिसुन येत आहे. पूर्वीपासून चालत आलेली,पूर्वीपासून सुरू असलेली ही प्रथा आजतागायत आहे तशीच सुरू आहे,प्रतिपदा श्रद्धाला पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून सुरुवात झाली आहे,सर्वपित्री अमावस्याला या पितृपक्षाची समाप्त होणार आहे.त्यानंतर अधिक आश्विन मासारंभ होणार आहे.या सर्व पितृपक्षाच्या काळात प्रत्येक दिवस हा कोणाच्या ना कोणाच्या घरी आपले पूर्वजांना( पितरांना) श्रद्धा घालण्याचे चित्र दिसून येत आहे.मात्र सध्या कोरोनाचा काळ सुरू आहे. या काळात सर्वच सण, उत्सव ,सर्व जयंत्या-पुण्यतिथ्या, साध्या पद्धतीने साजऱ्या होत आहे.उत्सवही साध्या पद्धतीने करण्यात आले आहेत.साजरे होत आहे.कोरोनाच्या याकाळात पितृपक्षातील श्राद्ध ही आता घरोघरी पण साध्या पद्धतीने साजरे होताना दिसत आहे.कोरोनामुळे पितृपक्षात श्राद्ध जेवण्यासाठी यावर्षी उपासकरू किंवा जेवण्यासाठी कोणी लवकरधांची धजावत नाही त्यामुळे दर वर्षी प्रमाणे या वर्षी पितृपक्षात मोठमोठ्या पंगती किंवा मोठ्या संख्येने लोक श्राद्ध जेवण्यांसाठी।दिसत नाहीत.या वर्षी श्राद्धची फार मोठी पूजाअर्चा ही दिसून येत नाही.मोजके व आपल्या घरातच आता पितृपक्षात श्राद्ध केले जात आहे व या कोरोनाच्या काळात शहरा प्रमाणे ग्रामीण भागातही कावळे किंवा काव काव हा आवाज दिसेनासा झाला आहे, तरीही घरोघरी पितृपक्षात श्राद्ध घालण्याची परंपरा ही साध्या पद्धतीने का होईना ती सुरू असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव यापासून वाढू नये याची दक्षता घेणे महत्त्वाचे आहे,कारण नुकतेच अहमदनगर जिल्ह्यातील एका गावात पितृपक्षात श्राद्ध जेवणासाठी आलेल्या अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.यामुळे आता प्रत्येकाने दक्षता ठेवणे गरजेचे आहे,नाहीतर पितृपक्षात श्राद्ध जेवण्यासाठी मित्रमंडळींची गर्दी झाली तर कोरोनाची बाधा दुर्दैवाने कधीकधी पसरू शकते व तशी घटना अहमदनगर जिल्ह्यातील एका गावांमध्ये नुकतीच घडली आहे.श्राद्ध जेवायला गेल्यानंतर सुमारे १८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले आहे.याची आता या पितृपक्षात प्रत्येकाने दखल,काळजी घेणे गरजेचे आहे.पितृपक्षात मोठमोठ्या जेवणावळी देऊन कधीकधी कोरोनाचा प्रसाद मिळु शकतो. ते सांगता येत नाही.त्यामुळे प्रत्येकाने दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. यावर्षी प्रत्येक सण उत्सव जयंत्या-पुण्यतिथ्या, लग्न समारंभ सर्व काही सार्वजनिक कार्यक्रम,उपक्रम, धर्मिक,पर्यटन सर्व गोष्टी प्रत्येकाने कोरोनामुळे टाळले आहेत, त्यामुळे आजुनही काही दिवस तरी प्रत्येकाने एकत्रित येणे,मोठी गर्दी करून उपक्रम किंवा कार्यक्रम साजरे करण्याचे टाळले पाहिजे.जसेजयंत्या-पुण्यतिथ्या,लग्न समारंभ,धार्मिक पर्यटन सण-उत्सव सर्व काही सार्वजनिक कार्यक्रम सार्वजनिक उपक्रम प्रत्येक जण गेल्या सहा महिन्यापासून टाळत आले आहे व अजूनही कोरोनामुळे काही दिवस असे कार्यक्रम टाळणे महत्त्वाचे आहे,त्याच प्रमाणे पितृपक्षात ही शब्द निमंत्रण देणे ही आपली परंपरा सुरू असली तरी तिलाही काही प्रमाणात गर्दी न करता साधेपणाने घरोघरी साजरी करणे महत्त्वाचे आहे.
Leave a Reply