जनशक्ती न्यूजसेवा
लोहगाव-( वार्ताहर)
राहता तालुक्यातील प्रवरानगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयात सहा सप्टेंबर रोजी वडाच्या फांद्या काढताना दुर्दैवी घटना घडली त्यात एकाचा अंत झाला परंतु अतिशय चुकीच्या पद्धतीने शाळेची बदनामी करण्याची काही काही सामाजिक संकेतस्थळावर संभ्रम निर्माण केला.या बातम्या आणि त्यातून शाळेची व आपली बदनामी झाल्याचा खेद विद्यालयाचे प्राचार्य मधुकरराव अनाप यांनी नुकताच व्यक्त केला आहे.
या विशाल वटवृक्षाला आपण खूप जपलेले असून सातत्याने काळजी घेत आहोत. त्याच्या सुद्धा काही फांद्या किंवा पारंब्या जर एकदमच खाली आल्या आणि धोकादायक वाटल्या तर यापूर्वीही अनेक वर्षांपासून सर्वांच्या संमतीने त्या काढल्या गेलेल्या आहेत आणि ते सुरक्षेच्या दृष्टीने योग्य असते परंतु आज मात्र आपण या वटवृक्षाची एकही फांदी काढलेली नाही.तो जसा आहे तसाच डौलाने व दिमाखाने उभा आहे-प्राचार्य अनाप
याबाबत सविस्तर वृत्त असे की,मागील तीन-चार दिवसांपासून शालेय परिसरातील धोकादायक झाडांच्या फांद्या शाळा व्यवस्थापनाने नियमानुसार काढल्या असतानासुद्धा काही असामाजिक तत्त्वांनी संभ्रम निर्माण होईल अशा पद्धतीने सामाजिक संकेतस्थळावर बातम्या पसरवल्या आहेत. त्यातून आपली व संस्थेची बदनामी झाली करण्याचा प्रयत्न केला आहे याचे आपल्याला अतिशय दुःख होत आहे.जे धोकादायक आहे ते सर्व नियमांना बांधील राहून व प्रशासकीय घटकांच्या सर्व संमतीने करणे हेही माझे कर्तव्यच आहे.आणि त्यातूनच जे केले आहे ते विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने महत्त्वाचे होते.ज्या माजी विद्यार्थी,या विद्यालयाची माजी रयत सेवक व माझे किंवा आपल्या सर्वांचे शिक्षक,पालक आणि हितचिंतक यांना हे समजले त्या सर्वांनी याची शहानिशा केली आणि आपल्याला दूरध्वनी तसेच प्रत्यक्ष भेटून पाठबळ दिले असून यात चुकीचे काही नाही असा अभिप्राय दिला. त्याबद्दल आपण या सर्वांचे आभारी आहे.आपल्या या विश्वासावरच आपण सेवानिवृत्त होऊन या विद्यालयासाठी तनमनधनाने सातत्याने काम करत राहणार आहे.चुकीच्या माहितीमुळे आपणा सर्वांना जो काही त्रास होऊन त्या क्षणापुरती का होईना माझ्याविषयी वेगळी भावना निर्माण झाली असेल त्याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो.
Leave a Reply