संपादक-नानासाहेब जवरे
वाकडी -(किरण शिंदे)
राहाता तालुक्यातील वाकड़ी येथील गोटेवाड़ी परिसरातील सुमारे २० ते २५ वर्षपासून शेतकऱ्यांच्या वादातील प्रलंबित असलेला रस्ता राहाता तहसिलदार कुंदन हिरे,मंडलाधिकारीं सी.एस.कुल्थे यांनी वाकड़ी गावचे सरपंच डॉ.संपतराव शेळके यांच्या उपस्थितीत खुला करुन दिला आहे.याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
मोठ्या प्रमाणात झालेल्या जमिनीच्या व्यवहारांमुळे जमिनीचे छोटे छोटे तुकडे झाले. जमीन मालक बदलले.त्यामुळे काही ठिकाणी नवीन खरेदीदाराला त्याच्या जमिनीत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध होत नाही.त्यामुळे तो तहसिलदारांकडे रस्ता मागणीचा अर्ज करतो.स्वत:च्या शेतजमिनीमध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४३ अन्वये इतर भूमापन क्रमांकाच्या सीमांवरुन रस्ता उपलब्ध करुन देण्याचा अधिकार तहसिलदारांना आहे.
वाकड़ी येथील गोटेवाड़ी परिसरातील या वादग्रस्त रस्त्यावर महाजन,कापसे,लहारे,बनकर,या वस्त्यावरील ग्रामस्थ राहत आहेत. मात्र कित्येक वर्ष या वादग्रस्त रस्त्यामुळे त्यांना बांधाने किंवा इतर शेतकऱ्यांच्या शेतातुन नाईलाजाने ये-जा करावी लागत होती.तसेच पावसाळ्यात याच लोकांना आपली साधने रस्त्यावर ठेऊन पायी चिखलातून ये-जा करावी लागत होती.याची सरपंच डॉ संपतराव शेळके यांना मिळताच त्यांनी तहसिलदार कुंदन हिरे यांच्याशी चर्चा करुण त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंडलाधिकारी सि. एस.कुल्थे यांच्या सुचनेने कामगार तलाठी श्री.आरसेवार यांनी संबधित शेतकऱ्यांना नोटिसा पाठवुन या रस्त्याविषयी दोन वेळेस चर्चा करण्यात आली होती.या वेळी सरपंच डॉ संपतराव शेळके यांनी संबधित शेतकऱ्यांमध्ये समझोता घड़वून आणला असता मंडलाधिकारी कुल्थे व कामगार तलाठी श्री आरसेवार यांच्या समक्ष या वादग्रस्त रस्त्याच्या दोन ही बाजूला असलेल्या क्षेत्राच्या माधोमध रस्ता आखनी करुण कित्येक वर्ष वाद असलेला रस्ता खुला करण्यात आला हा रस्ता खुला करण्यासाठी आलेश कापसे,बाळासाहेब भालेराव या शेतकऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.या वेळी भाऊसाहेब खरात,विट्ठल भालेराव,सोपान भालेराव,संजय लहारे आदिसह शेतकरी उपस्थित होते.यावेळी श्रीरामपुर ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मसूद खान यांनी देखील भेट दिली. या आधी सरपंच डॉ संपतराव शेळके व सुरेश लहारे यांनी असाच कित्येक वर्ष वादग्रस्त असलेल्या लांडेवाड़ी भागातील रस्ता वाद व डोखे तांबोळी वस्ती कड़े जाणाऱ्या रस्त्याचा वाद सर्वांना सामावून घेत सामंजस्याने मिटविला होता.
Leave a Reply