संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यातील खाजगी शाळा या जिल्हा परिषदेच्या शाळापेक्षा दर्जेदार शिक्षण देत असून त्यांची शैक्षणिक शुल्काबाबत कोणीही बदनामी करू नये असे आवाहन जिल्हा परिषद राष्ट्रवादीचे माजी गटनेते केशवराव भवर यांनी केले आहे.
नगर जिल्ह्यातील खाजगी शाळा दर्जेदार शिक्षण देत आहेत.या शाळा कोरोना काळात पठाणी वसुली करतात असे आरोप सध्या वर्तमानपत्रात वाचावयास मिळत आहेत.वास्तविक या शाळा कमी शैक्षणिक शुल्क आकारून दर्जेदार शिक्षण देत आहेत.या उलट जिल्हा परिषद शाळा आपल्या शिक्षकांना जास्त पगार देऊनही शिक्षण इतके प्रभावी देत नाही त्या बाबत कोणीही काही चकार शब्द काढत नाही-केशवराव भवर
राज्यात सरकारने स्वयंसहाय्यित शाळाना परवानगी देऊन त्या शाळा आता नावारूपाला आल्या आहेत.मात्र अलीकडील काळात खाजगी शाळांना बदनाम करण्याचा गोरख धंदा काही अपप्रवृत्तीनी सुरु केला आहे.राज्यातील व नगर जिल्ह्यातील खाजगी शाळा दर्जेदार शिक्षण देत आहेत.या शाळा कोरोना काळात पठाणी वसुली करतात असे आरोप सध्या वर्तमानपत्रात वाचावयास मिळत आहेत.वास्तविक या शाळा कमी शैक्षणिक शुल्क आकारून दर्जेदार शिक्षण देत आहेत.या उलट जिल्हा परिषद शाळा आपल्या शिक्षकांना जास्त पगार देऊनही शिक्षण इतके प्रभावी देत नाही त्या बाबत कोणीही काही चकार शब्द काढत नाही.याबाबत आमच्या इंग्रजी शाळांचे जाहीर आवाहन आहे की,शैक्षणिक शुल्काबाबत कोणतीही शाळा बळजोरी करत असले तर त्या शाळांचे नाव जाहीर करावे उगीच साप-साप म्हणून भुई बडवू नये.कुठल्यातरी असंबंधीत शाळांचे रागपोटी अन्य शाळांना बदनाम करू नये.वास्तविक खाजगी शाळांचे शिक्षकांना कमी पगार असल्याने त्यांचे शिक्षक भाजीपाला विकताना दिसत आहे.तसे जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक कुठे रोजगार करताना दिसत नाही.तरीही त्यांचे पगार मात्र वेळेवर करताना दिसत आहे.
खाजगी शाळां सरकारचे आदेशाने पंचवीस टक्के आर.टि. ई.अंतर्गत पहिले ते आठवी पर्यंत प्रवेश देत आहे.मात्र त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क मात्र सरकार दोन ते तीन वर्ष देताना दिसत नाही.सरकारने हे अनुदान तात्काळ द्यावे अशी मागणीही भवर यांनी केली आहे.सरकारी शाळांना प्रत्येक विद्यार्थ्या मागे प्रतिवर्ष ९४ हजारांचा खर्च येतो मात्र त्या प्रमाणात त्या विद्यार्थ्याला त्याचा फायदा मिळतो का असा कडवा सवालही त्यांनी शेवटी केला आहे.व सरकारी शाळा व खाजगी शाळा त्यांचा तुलनात्मक अहवाल तयार करायला हवा अशी मागणी हि त्यांनी शेवटी केली आहे.व खाजगी शाळाच दर्जेदार शिक्षण देत असल्याचा केशवराव भवर यांनी शेवटी दावा केला आहे.
Leave a Reply