संपादक-नानासाहेब जवरे
नांदूखीं-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील नांदुर्खी खुर्द जिल्हा परिषद शाळेच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम व वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.त्याला विद्यार्थी व पालकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
वार्षिक स्नेहसंमेलन तसेच इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत विविध कला गुणाने या कार्यक्रम संपन्न झाले. वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी लहान बालकांनी गाण्याचा ठेका धरत प्रेक्षकांचे व पालकांचे मने जिंकून घेतली. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक श्री गायकवाड व शिक्षिका सौ.राठोड मॅडम यांनी केले. यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये सरपंच बापूराव वाणी, उपसरपंच सतीश वाणी व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरख वाणी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राहता तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सर्व शिक्षक वर्ग व केंद्रप्रमुख श्री शिरसागर गटशिक्षणाधिकारी श्री काळे विस्ताराधिकारी शबाना शेख व पोलीस पाटील सोमनाथ वाणी, विजय वाणी, सुरेश वाणी, पोपटराव वाणी, आप्पासाहेब वाणी,आदी मान्यवर उपस्थित होते. या लहान बालकांनी सुंदर गाण्याच्या ठेक्यावर प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. त्याबद्दल शाळेसाठी रोख स्वरूपात बक्षीसे देण्यात अली आहे.संपत वाणी आपल्या मुलाच्या स्मरणार्थ शाळेसाठी नवीन स्टेज बांधून देण्यात आले आहे. त्यांचा ग्रामस्थ, ग्रामपंचायत, सोसायटीचे पदाधिकारी यांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला व या कार्यक्रमासाठी उपस्थित नांदूर खुर्द मधील सर्व महिला वर्ग सर्व ग्रामस्थ माजी विद्यार्थी पालक वर्ग तरुण मंडळी कार्यकर्ते उपस्थित होते व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक गायकवाड सर यांनी केले व आभार सौ राठोड यांनी मानले.
Leave a Reply